सुरत, 19 जानेवारी : धगधगत्या (Surat News) बसमध्ये एका महिलेच्या आवाजामुळे रस्त्यातून जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर काटाच उभा राहिला. मंगळवारी रात्री एका खासगी बसमध्ये आग (Private Bus on Fire) लागल्यामुळे त्यातील एक महिला प्रवासी जीवंत जळाली. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात महिला खिडकीबाहेर हात दाखवून मदतीची याचना करीत होती. या अपघातात एक व्यक्ती जखमी झाला असून त्याला सुरतच्या सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
शॉर्ट सर्किटमुळे लागली आग
सूरतचे मुख्य फायर ब्रिगेड ऑफिसर बसंत पारिक यांनी सांगितलं की, प्राथमिक तपासानुसार बसमधील शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. वायरिंग जळत असल्यामुळे एसी कंप्रेसरमध्ये स्फोट झाला आणि काही क्षणात आग पसरली.
हे ही वाचा-महिलेसह दोघांकडून तरुणाला महामार्गावर फ्री स्टाईल मारहाण; घटनेचा LIVE VIDEO
2-3 मिनिटात संपूर्ण बस जळून खाक
स्थानिय लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस कटारगाम भागातून भावनगरच्या दिशेने रवाना झाली. यावेळी खूप कमी प्रवासी होते. पारिक म्हणाली, जेव्हा ही बस रात्री साधारण साडे नऊ वाजता हीराबाग सर्किलमध्ये आली तेव्हा अचानक बसच्या मागच्या बाजूला स्फोट झाला आणि आग लागली. मागून येणाऱ्या दुसऱ्या बसने ड्रायव्हरला बसला आग लागल्याचं सांगितलं. ड्रायव्हरने तातडीने बस थांबवली आणि प्रवाशांनी बसमधून खाली उतरण्यात सांगितल.
मात्र पुढील 2 ते 3 मिनिटात संपूर्ण बसला आग लागली आणि बस जळून राख झाली. मिळालेल्या माहितीनुसार, बसला आग लागल्यानंतर महिला पती खाली उतरला. मात्र महिला बसमध्येच राहिली. पुढल्या काही क्षणात बसने पेट घेतला. त्यामुळे कोणीच तिला बाहेर काढण्यासाठीदेखील जाऊ शकलं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fire, Gujrat, Shocking accident, Surat