Beed: महिलेसह दोघांकडून तरुणाला महामार्गावर फ्री स्टाईल मारहाण; घटनेचा LIVE VIDEO
Beed: महिलेसह दोघांकडून तरुणाला महामार्गावर फ्री स्टाईल मारहाण; घटनेचा LIVE VIDEO
Crime in Beed: बीड-सोलापूर महामार्गावरील (Beed- solapur highway) रौऊळगाव चौकात एका महिलेसह दोन जणांनी एका तरुणाला फ्री स्टाईल मारहाण (young man beaten by 3 people) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
बीड, 18 जानेवारी: बीड-सोलापूर महामार्गावरील (Beed- solapur highway) रौऊळगाव चौकात एका महिलेसह दोन जणांनी एका तरुणाला फ्री स्टाईल मारहाण (young man beaten by 3 people) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी पैशाच्या व्यवहारातून (dispute over money) तरुणाला ही मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा सर्व प्रकार महामार्गावरच सुरू असल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. यावेळी काही जणांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण कोणीही ऐकून घ्यायला तयार नव्हतं. मारहाण आणि शिवीगाळीचा हा प्रकार जवळपास 1 तास सुरू होता.
या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर वेगानं व्हायरल (Viral video) होतं आहे. यामध्ये दोन पुरूष आणि एक महिला संबंधित तरुणाला शिवीगाळ करत मारताना दिसत आहे. यावेळी संबंधित महिलेनं रस्त्यावरील दगडाने तरुणाला मारण्याचा प्रयत्न केला आहे. हा सर्व प्रकार एका प्रत्यक्षदर्शीने आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला आहे.
हेही वाचा-बारामतीत पर्यटनाचं बुकिंग करणाऱ्या महिलेवर चाकुने केले वार, भयावह घटनेचा VIDEOनेमकं प्रकरण काय आहे?
बीड-सोलापूर महामार्गावरील अंजनवती येथील पीडित तरुणाकडे त्याच परिसरातील वाणगाव येथील एका व्यक्तीचे पैसे आहेत. वारंवार पैसे मागून देखील संबंधित तरुण पैसे देत नव्हता. त्यामुळे आरोपींनी पैसे वसून करण्यासाठी हा धक्कादायक प्रकार अवलंबला आहे. एकाच कुटुंबातील तिघांनी मिळून बीड-सोलापूर महामार्गावरील रौऊळसगाव चौकात संबंधित तरुणाला फ्री स्टाईल मारहाण केली.
बीड-सोलापूर महामार्गावरील रौऊळगाव चौकात एका महिलेसह दोन जणांनी एका तरुणाला फ्री स्टाईल मारहाण केली आहे. pic.twitter.com/gTZEfx6yn0
हेही वाचा-पुण्यात टोळक्याची दहशत; हातात हत्यारं घेत वाहनांची तोडफोड, थरारक VIDEO समोर
महामार्गावर हा प्रकार जवळपास एक तास सुरू होता. यामुळे घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी अनेकांनी मध्यस्थी करत भांडणं सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र काही केल्या हे तिघे ऐकण्याच्या तयारीत नव्हते. पैशांच्या देवाण-घेवाणीतून भररस्त्यात या तिघांनी गुंडागर्दी करत तरुणाला मारहाण केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे या तिघांवर आता कारवाई होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.