तिच्याच दारात त्याने घेतले पेटवून, विचारले होते शेवटचे पण...

तिच्याच दारात त्याने घेतले पेटवून, विचारले होते शेवटचे पण...

संबंधित तरूणाच्या फेसबुकवर अकांऊटवरून सुसाईड नोट आणि काही फोटो पोस्ट करण्यात आले आहे.

  • Share this:

अहमदनगर, 18 सप्टेंबर : जिल्ह्यात प्रेमसंबंधातून स्वतःला संपवून घेण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील तरूणाने स्वतःला गोळी मारून संपवल्याची घटना ताजी असतानाच शिर्डीमध्ये मुलीने लग्नास नकार दिल्याने तरूणाने स्वतःला पेटवून घेतले आहे. यात तरूणाचा मृत्यू झाला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घडलेल्या या घटनांनी खळबळ उडाली आहे. शिर्डीमध्ये गुरूवारी दुपारी सार्थक बनसोडे या तरूणाने मुलीने लग्नास नकार दिल्याने तीच्या घरासमोर स्वतःला पेटवून घेतले. या घटनेत सदर मुलीचे वडील आणि तरूणीही जखमी झाले आहेत. 90 टक्के भाजलेल्या तरूणावर रुग्णालयात उपचार सुरू असताना आज त्याचा मृत्यू झाला. सदर प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केला आहे.

अखेर Kia Sonet ची किंमत जाहीर, कार पेक्षाही ठरली सर्वात स्वस्त SUV !

शिर्डीच्या घटनेत संबंधित तरूणाच्या फेसबुकवर अकांऊटवरून सुसाईड नोट आणि काही फोटो पोस्ट करण्यात आले आहे. याचा देखील सायबर सेल तपास करत आहेत.

दुसरी घटना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा इथं घडली होती. विक्रम मुसमाडे या तरूणाने 15 सप्टेंबर रोजी तरूणीवर गोळीबार करत स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. या प्रकरणात सदर तरूणी सुदैवाने वाचली आहे.

कशा अवस्थेत सापडला होता दिशाचा मृतदेह?रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरने केला हा खुलासा

खरंतर प्रेम जगायला शिकवतं, जिवापाड जपायला शिकवतं. मात्र, आजकाल प्रेमात नकार मिळाला तर दुसऱ्याला आणि स्वतःला संपवण्याची वाढत चाललेली ही मानसिकता समाजासाठी घातक आहे.

Published by: sachin Salve
First published: September 18, 2020, 5:12 PM IST

ताज्या बातम्या