अखेर Kia Sonet ची किंमत जाहीर, कार पेक्षाही ठरली सर्वात स्वस्त SUV !

अखेर Kia Sonet ची किंमत जाहीर, कार पेक्षाही ठरली सर्वात स्वस्त SUV !

Kia Sonet मध्ये दोन ट्रिम लाइन, 4 इंजिन आणि 5 गियरबॉक्स ऑप्शन्ससह तब्बल 15 प्रकारात ही गाडी लाँच केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 सप्टेंबर : Kia Motors ने अखेर आपल्या बहुचर्चित Kia Sonet कॉम्पक्ट एसयूव्ही कार लाँच केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या गाडीची किंमत किती असेल यावर बरेच तर्कवितर्क लढवले गेले. पण अखेर Kia Motors यावरुन पडदा बाजूला करत गाडीची किंमत जाहीर केली आहे. या दमदार एसयुव्हीची किंमतही  6.71 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होणार आहे. त्यामुळे Kia Sonet ही भारतातील सर्वात स्वस्त एसयुव्ही ठरली आहे.

Kia Sonet मध्ये दोन ट्रिम लाइन, 4 इंजिन आणि 5 गियरबॉक्स ऑप्शन्ससह तब्बल 15 प्रकारात ही गाडी लाँच केली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रकारात या गाडीची किंमतही कमी जास्त आहे.

Kia Sonet ने जाहीर केलेल्या किंमतीनुसार (All prices ex-showroom),

Kia Sonet 1.2-लिटर पेट्रोल HTE (5MT) - 6.71 लाख

Kia Sonet 1.2-लिटर पेट्रोल HTK (5MT) - 7.59 लाख

Kia Sonet 1.2-लिटर पेट्रोल HTK (5MT) - 8.45 लाख

Kia Sonet 1.0-लिटर टर्बो पेट्रोल HTK (6MT) - 9.49 लाख

Kia Sonet 1.0-लिटर टर्बो पेट्रोल HTK (7DCT) -  10.49 लाख

Kia Sonet 1.0-लिटर टर्बो पेट्रोल HTX (6MT) - 9.99 लाख

Kia Sonet 1.0- लिटर टर्बो पेट्रोल HTX (6MT) -  11.65 लाख

Kia Sonet 1.0 - लिटर टर्बो पेट्रोल GTX (6iMT) -  11.99 लाख

Kia Sonet 1.5- लिटर डिझेल WGT HTE (6MT) -  8.05 लाख

Kia Sonet 1.5-लिटर डिझेल WGT HTK (6MT) - 8.99 लाख

Kia Sonet 1.5- लिटर डिझेल WGT HTK (6MT) -  9.49 लाख

Kia Sonet 1.5-litre Diesel WGT HTX (6MT) -   9.99 लाख

Kia Sonet 1.5 - लिटर डिझेल WGT HTX (6MT) -  11.65 लाख

Kia Sonet 1.5 - लिटर डिझेल WGT GTX (6MT) - 11.99 लाख

Kia Sonet 1.5 - लिटर डिझेल VGT HTK (6AT) - 10.39 लाख

किआ मोटर्स (Kia Motors) ने  Kia Sonet ला एक कनेक्टेड कार म्हणून लाँच केली आहे. ही कार iMT आणि व्हायरस प्रोटेक्शन अशा फिचर्ससह लाँच करण्यात आली आहे. Kia Sonet ही भारतातील दुसरी कार आहे. ज्यात IMT ट्रान्समिशन देण्यात आले आहे. या कारमध्ये IMT ट्रान्समिशन, म्यॅनुअल शिफ्ट लिव्हर कंट्रोल, क्लचलेस गियर शिफ्टिंग दिले आहे. असेच फिचर्स अलीकडेच हुंदुईने आपल्या Venue मध्ये दिले आहे.

सोनेटमध्ये सेल्टोस सारखेच UVO कनेक्टेड टेक्नोलॉजी दिली आहे. तसेच या कारमध्ये 57 कनेक्टेड फिचर्स दिले आहे. kia Sonet एक कॉम्पॅक्ट SUV आहे. यात 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेंटमेंट सिस्टिम दिली आहे.

या शिवाय कारमध्ये Bose ची 7 स्पीकर सिस्टम, इलेक्ट्रिक सनरूफ, फ्रंट व्हेंटिलेटेड सिट्स दिले आहे. एवढंच काय कर ही कार स्मार्ट वॉचशी कनेक्टेड होऊ शकते.  पेट्रोल इंजिनमध्ये 5 स्पीड मॅन्युअल, 6 स्पीट मॅन्युअल, 6 स्पीड AT आणि 6 स्पीड 5MT ऑप्शन दिले आहे. बोल्ड डिझाइनमध्ये टायगर नोज ग्रिल, थ्री डायमेंशनल स्टेपवॅल जियोमेट्रिक ग्रिल दिले आहे.

किआ मोटर्स (Kia Motors) ने प्री-बुकिंग सुरू केली आहे. देशभरातील Kia Sonet ची बुकिंग डिलरकडे किंवा किआ मोटर्सच्या www.kia.com/in वेबसाईटवरही करता येणार आहे. फक्त 25 हजारांमध्ये ही कार तुम्हाला बूक करता येणार आहे.

Kia Sonet ही आपल्या सेगमेंटमध्ये Hyundai Venue, Maruti Suzuki Vitara Brezza, Mahindra XUV300, Ford EcoSport आणि Tata Nexon गाड्यांना टक्कर देणार आहे.

Published by: sachin Salve
First published: September 18, 2020, 4:44 PM IST
Tags:

ताज्या बातम्या