कशा अवस्थेत सापडला होता दिशाचा मृतदेह? रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरने केला हा खुलासा

कशा अवस्थेत सापडला होता दिशाचा मृतदेह? रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरने केला हा खुलासा

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)ची एक्स मॅनेजर दिशा सॅलियनच्या (Disha Salian) आत्महत्येनंतर असे वृत्त समोर आले होते की, जेव्हा तिचा मृतदेह सापडला तेव्हा तिच्या शरिरावर कपडे नव्हते.

  • Share this:

मुंबई, 18 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)ची एक्स मॅनेजर दिशा सॅलियनच्या (Disha Salian) आत्महत्येनंतर असे वृत्त समोर आले होते की, जेव्हा तिचा मृतदेह सापडला तेव्हा तिच्या शरिरावर कपडे नव्हते. मात्र रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हर असणाऱ्या पंकज याने अशी प्रतिक्रिया दिली आहे की, जेव्हा 8 जून रोजी दिशाने आत्महत्या केली होती त्यावेळी रुग्णवाहिकेसाठी पोलीस ठाण्यातून फोन आला होता. पण तो दिशाच्या घरी पोहचेपर्यत मृतदेह खाजगी गाडीतून नेण्यात आला होता. मालाडच्या दोन वेगवेगळ्या खाजगी दवाखान्यात आधी नेण्यात आला त्यानंतर कांदीवलीच्या शताब्दीमध्ये मृतदेह आणण्यात आला.

पंकजने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या हनुवटीशी जखम होती, एक हात तुटलेला होता आणि डोक्यातून रक्त वाहत होते. पंकजने सांगितले की जेव्हा त्याने तो मृतदेह पाहिला तेव्हा त्यावर लाल रंगाचा टॉप आणि क्रीम कलरची लेगिंग्ज होती. दिशाचा मृतदेह मिळाला तेव्हा त्यावर कपडे होते. दरम्यान दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणात चौकशी अद्याप सुरू आहे.

(हे वाचा-प्रसिद्ध फॅशन डिझायनरचा संशयास्पद पद्धतीने मृत्यू, बाथरुममध्ये सापडला मृतदेह)

मृत्यूच्या अगदी काही वेळ आधी दिशाच्या फोनवरून 100 नंबरवर म्हणजेच मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात फोन करण्यात आला होता अशी माहिती समोर आली होती. पण दिशाने 100 नंबरवर फोन केलाच नव्हता असे उघड झाले आहे. पोलिसांना फोन केल्यानंतर दिशाने सुशांतला फोन केला असा खुलासा एका भाजप नेत्याने केला होता. दिशाने पोलिसांना आणि सुशांतला बोलवून तिच्यासोबत काहीतरी चुकीचे घडलं आहे आणि त्याचा जीव धोक्यात आहे असं सांगितलं होतं, असं यात म्हणण्यात आले होते. पण तिने हा फोन केलाच नव्हता तर त्यावेळी ती तिच्या लंडनमधल्या एका मैत्रिणीशी बोलत असल्याचं तपासात समोर आलं आहे.

(हे वाचा-प्रसिद्ध ड्रग रिहॅबिलिटेशन स्पेशलिस्टवर अल्पवयीन मुलीच्या बलात्काराचा आरोप)

या प्रकरणी मुंबई पोलिसांनी कसून चौकशी केली असता धक्कादायक सत्य समोर आला आहे. मुंबई पोलीस आणि दिशाच्या आई-वडीलांशी यासंबंधी चौकशी केली असता ही एक फक्त कहानी आहे असं काहीही घडलं नसल्याचं समोर आलं आहे. तपासानंतर 1 जून ते 8 जून या कालावधीत दिशाच्या मोबाइल फोनवरून मुंबई पोलिसांना कोणताही फोन आला नाही. मृत्यूच्या जवळपास एक महिना आधी 10 मे रोजी दिशाच्या मोबाइलवरून 100 वर एक फोन करण्यात आला होता.

Published by: Janhavi Bhatkar
First published: September 18, 2020, 4:42 PM IST

ताज्या बातम्या