जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / ट्रकच्या चाकाखाली चिरडून विद्यार्थ्याचा मृत्यू, हादरवून टाकणारा CCTV VIDEO आला समोर

ट्रकच्या चाकाखाली चिरडून विद्यार्थ्याचा मृत्यू, हादरवून टाकणारा CCTV VIDEO आला समोर

ट्रकच्या चाकाखाली चिरडून विद्यार्थ्याचा मृत्यू, हादरवून टाकणारा CCTV VIDEO आला समोर

सुरतमधील एका अपघाताची दृश्य विचलित करणारी आहेत. काही दिवसांपूर्वी हा अपघात घडला होता आणि त्याचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

किर्तेश पटेल, सुरत, 10 फेब्रुवारी: सुरतमधील एका अपघाताची दृश्य विचलित करणारी आहेत. काही दिवसांपूर्वी हा अपघात घडला होता आणि त्याचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. शहरात दिवसेंदिवस रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच सुरतच्या कटारगाम भागात एक बेपर्वाईने ट्रक चालवणाऱ्या एका चालकाने बीबीएलच्या विद्यार्थ्याला चिरडल्याची घटना घडली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या अपघाताची दृश्य मन हेलावून टाकणारी आहेत. गुजरातमधील अनेक महानगरं रस्ते अपघाताची केंद्र बनली आहेत. याठिकाणी बेपर्वा वाहनचालकांच्या चुकांमुळे हे अपघात घडून येतात. 25 जानेवारी रोजी कटारगाम भागात हा भीषण अपघात झाला होता बीबीएमध्ये शिकत असलेल्या जय इटलीया नावाच्या विद्यार्थ्याचा यामध्ये मृत्यू झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले होते, मात्र हा अपघात इतका भीषण होता की त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या संपूर्ण घटनेचे फुटेज ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. (हे वाचा- संतापजनक! धारधार शस्त्राने कुत्र्याची केली हत्या, पोलिसांकडून गुन्हा दाखल ) फुटेजमध्ये एक पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवर वेगात असलेल्या ट्रकने धडक दिल्याचे दिसत आहे. घटनेनंतर चालकाने ट्रकमधून खाली उतरून पळ काढला. कटारगाम पोलिसांनी सध्या ट्रक ताब्यात घेतला आहे. या ट्रकच्या चाकाखाली जय चिरडला जातो, मोठ्या अंतरावर तो फरफटला देखील गेल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. दरम्यान अपघात झाल्याचं कळताच ट्रक ड्रायव्हर पसार झाला आहे.

जाहिरात

(हे वाचा- UP: मारहाण करत पोलिसाची हत्या, 12 तासांच्या आत पोलिसांनी असा घेतला ‘बदला’ ) हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, संध्याकाळी 4 नंतर अवजड वाहनांना सूरत शहरात प्रवेश दिला जात नाही. मात्र, पोलिसांच्या संरक्षणाखाली वाहने शहरात दाखल होत असल्याचा आरोप केला जात आहे. या वाहनांमुळेच अशाप्रकारे अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे असा प्रश्न उपस्थित होतो आहे की अशाप्रकारे नियम धाब्यावर बसवून वागणाऱ्या ट्रक चालकांवर पोलीस कारवाई का करत नाहीत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात