अहमदाबाद, 10 फेब्रुवारी: रस्त्यावरील भटकणाऱ्या कुत्र्यांना (Stray Dog) बऱ्याचदा कुणीच वाली नसतो. पण काही माणसं अशी असतात की ज्यांच्याकडे स्वत:साठी खायला नसेल पण ते कुत्र्यांना खाऊ घालतात. पण दुसरीकडे अशीही काही माणसं असतात की ते या बिचाऱ्या मुक्या प्राण्यांना जगू देत आहेत. गुजरात राज्यातील कागडापीठ (Kagdapith) याठिकाणी देखील अशीच एक घटना घडली आहे. याठिकाणी एका व्यक्तीविरोधात कुत्र्याची हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कागडापीठ याठिकाणच्या एका रहिवाशाविरोधात कुत्र्याला एका धारदार वस्तूने मारल्याच्या आरोपाखाली ‘प्रिव्हेन्शन ऑफ क्रूलेटी टू अॅनिमल अॅक्ट’ (Prevention of Cruelty to Animal Act) आणि आयपीसीच्या (IPC) काही कलमांखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अहमदाबाद मिरर ने याबाबत वृत्त दिले आहे. सोमवारी ही घटना घडल्याचे समोर आले आहे. कागडापीठ याठिकाणी हिरालाल चाळीत राहणारे बाबुभाई पारघी या रस्त्यावरील कुत्र्यांची काळजी घेत असे. रोजंदारीवर काम करणाऱ्या बाबुभाईंना त्यांच्या बायकोने असे सांगितले की एका कुत्र्याला खूप वाईट पद्धतीने मारण्यात आले आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली. (हे वाचा- ‘मला विसरण्याचा प्रयत्न केला ना तर…’ लिहीत नववीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या ) कुत्रा जखमी असल्याने पारघी यांनी सुरुवातीला एनिमल हेल्पलाइनला कॉल करण्याच प्रयत्न केला पण तोपर्यंत कुत्र्याचा मृत्यू झाला होता. त्याठिकाणीच्या आणखी एका रहिवाशाने राजेंद्र छावडा नावाच्या एका इसमावर कुत्र्यांवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. पारघी यांनी त्यानुसार पोलिसांमध्ये रीतसर तक्रार दाखल केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.