Home /News /crime /

देश हादरला! निर्भयाची पुनरावृत्ती; मूकबधीर अल्पवयीन मुलीवर गँगरेप; भयंकर अवस्थेत रस्त्यावर फेकलं

देश हादरला! निर्भयाची पुनरावृत्ती; मूकबधीर अल्पवयीन मुलीवर गँगरेप; भयंकर अवस्थेत रस्त्यावर फेकलं

राजस्थानच्या अल्वर येथे मूकबधिर अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या (Gang Rape on Minor Girl in Alwar) प्रकरणातील सत्य समोर आल्यानंतर सगळेच थक्क झाले आहेत

  जयपूर 13 जानेवारी : सामूहिक बलात्काराची एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानच्या अल्वर येथे मूकबधीर अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या (Gang Rape on Minor Girl in Alwar) प्रकरणातील सत्य समोर आल्यानंतर सगळेच थक्क झाले आहेत. जयपूरमध्ये आठ डॉक्टरांच्या टीमने पीडितेचं मोठं ऑपरेशन केलं आहे. पीडितेची अवस्था सध्या स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. दिल्लीतील निर्भया घटनेचीच (Nirbhaya Gang Rape) राजस्थानमध्ये पुनरावृत्ती झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. आरोपींच्या अटकेसाठी एसआयटी गठीत करण्यात आली आहे. मात्र अद्याप आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत.

  बेदम मारहाण करत केलं आगीच्या हवाली, मुलांच्या डोळ्यादेखत बायकोची भयावह हत्या

  अल्वरमधील सामूहिक बलात्कारानंतर रस्त्यावर फेकलेल्या अल्पवयीन मुलीला बुधवारीच अलवरहून जयपूरला घेऊन जाण्यातं आलं. जयपूरच्या जेके लोन हॉस्पिटलमध्ये 8 डॉक्टरांच्या टीमने पीडितेवर मोठं ऑपरेशन केलं. ऑपरेशननंतर पीडितेची प्रकृती स्थिर आहे. तिला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. पीडितेला रक्तही देण्यात आलं आहे. तिची एक शस्त्रक्रियाही करावी लागणार आहे. पीडितेचा रक्तदाब आणि ऑक्सिजन सामान्य आहे. . या 14 वर्षांच्या मूकबधीर अल्पवयीन मुलीवर अल्वरमध्ये सामूहिक बलात्कार तर झालाच, पण गुन्हेगारांनी क्रौर्याची परिसीमा ओलांडली आणि धारदार वस्तूने तिच्या प्रायव्हेट पार्टला इजा केली. यामुळे पीडिता गंभीर जखमी झाली. मंगळवारी रात्री पीडित तरुणी एका उड्डाण पुलाजवळ पडलेली आढळून आली. प्रथम तिला अल्वर येथील रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर तिला तातडीने जयपूरला रेफर करण्यात आलं.

  एकाच महिलेसाठी दोघांनी बांधलं गुडघ्याला बाशिंग, विचित्र कृत्यामुळे झाले गजाआड

  या क्रूरतेच्या घटनेनंतर राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी ट्विट करून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, अल्वरमध्ये बलात्कारानंतर एका मूकबधिर अल्पवयीन मुलीला रस्त्यावर फेकून देण्याच्या घटनेने राजस्थानला तर लाजवलंच पण काँग्रेस सरकारच्या ढिसाळ कायदा आणि सुव्यवस्थेचा पर्दाफाश केला आहे. राज्यात मुली दिवसेंदिवस वासनेला बळी पडत आहेत, मात्र सरकार मात्र शून्य झालं आहे. महिलांच्या स्वाभिमानाचा समानार्थी असलेल्या राजस्थानमध्ये मुलींवर होणारे अत्याचार सहन केले जाऊ शकत नाहीत. महिलांवरील गुन्ह्यांच्या बाबतीत देशात पहिल्या क्रमांकावर आलेल्या राजस्थानला शोषणमुक्त करण्यासाठी काँग्रेस सरकारने कठोर पावले उचलायला हवीत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Crime news, Gang Rape, Nirbhaya gang rape case, Rajasthan

  पुढील बातम्या