Home /News /aurangabad /

एकाच महिलेसोबत लग्नासाठी दोन तरुण झाले उतावीळ, सोशल मीडियावर केली भलतीच पोस्ट, खावी लागली जेलची हवा

एकाच महिलेसोबत लग्नासाठी दोन तरुण झाले उतावीळ, सोशल मीडियावर केली भलतीच पोस्ट, खावी लागली जेलची हवा

Crime in Aurangabad: एकतर्फी प्रेमात एखादी व्यक्ती कधी काय करू शकेल, याचा काहीही नेम नसतो. औरंगाबादमधील दोन तरुणांनी एकतर्फी प्रेमातून (One sided love) सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.

    औरंगाबाद, 12 जानेवारी: एकतर्फी प्रेमात एखादी व्यक्ती कधी काय करू शकेल, याचा काहीही नेम नसतो. औरंगाबादमधील (Aurangabad) दोन तरुणांनी एकतर्फी प्रेमातून सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यांनी व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामवर एकाच महिलेचा फोटो स्टेटसला ठेवून तिला आपली भावी बायको (upload photos of same woman with caption Future wife) असं संबोधलं आहे. सोशल मीडियावर अशाप्रकारचं विचित्र कृत्य करणं त्यांना चांगलंच महागात पडलं आहे. संबंधित दोन्ही लग्नाळू तरुणांना सायबर पोलिसांनी अटक (2 accused arrested) केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. प्रवीण मदन तुपे (27, रा. मिसारवाडी) आणि सुमित धीरज मोरे (19, रा. पृथ्वी पार्क, पडेगाव) असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. या प्रकरणी एका विवाहित महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचं आपल्या पतीसोबत पटत नाही. त्यामुळे ती आपल्या लहान बाळासह शहरात एकटी राहते. दरम्यान काही दिवसांपूर्वी तिची ओळख वाहनचालक प्रवीण तुपे याच्यासोबत झाली होती. हेही वाचा-25 वर्षीय नर्सवर डॉक्टरकडून बलात्कार; मित्रांनीही साधली संधी, औरंगाबादमधील घटना याच ओळखीतून आरोपी तुपे पीडित महिलेवर एकतर्फी प्रेम करून लागला. यातून त्यानं काही दिवसांपूर्वी पीडित महिलेला लग्नासाठी विचारणा केली. पण पीडित महिलेनं त्याला स्पष्टपणे नकार दिला. दरम्यान आरोपी सुमित मोरे हाही पीडित महिलेवर एकतर्फी प्रेम करू लागला. त्यानेही पीडित महिलेला लग्नासाठी विचारणा केली. त्यालाही महिलेनं नकार दिला. पण लग्नासाठी उतावीळ झालेल्या या दोन्ही तरुणांनी पीडित महिलेचे फोटो स्वत:च्या व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रावर अपलोड करून भावी पत्नी असं संबोधित करायला सुरुवात केली. हेही वाचा-समाजकार्यासाठी बोलावून विवाहितेला अडकवलं जाळ्यात; 10महिने सुरू होता भयंकर प्रकार आरोपीच्या या कृत्यामुळे पीडित महिलेची समाजात बदनामी झाली. त्यामुळे अखेर तिने 27 डिसेंबर रोजी सायबर पोलिसांत धाव घेत, फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध पुरावे गोळा केल्यानंतर, मंगळवारी दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Aurangabad, Crime news

    पुढील बातम्या