हाजीपूर, 12 जानेवारी: कौटुंबीक वादातून एका तरुणाने आपल्या दोन मुलांच्या डोळ्यादेखत पत्नीची निर्घृण हत्या (Wife's brutal murder by husband) केली आहे. आरोपीनं पत्नीला काठीने बेदम मारहाण (Husband beat wife) करत तिची हत्या केली आहे. त्यानंतर पुरवा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला आहे. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत महिलेच्या पतीसह सासू, सासऱ्याला अटक केली (3 Accused arrest) आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. संबंधित घटना बिहार राज्याच्या वैशाली जिल्ह्यातील आहे.
लाल मुनी देवी असं हत्या झालेल्या 25 वर्षीय विवाहित महिलेचं नाव आहे. ती देशारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुरव्वतपूर गावातील रहिवासी आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती संजय राऊत, सासरे विशिष्ट राऊत आणि सासू उत्तम देवी यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती संजय याने आपल्या पत्नीला दोन अल्पवयीन मुलांच्या डोळ्यादेखत काठीने बेदम मारहाण केली आहे.
हेही वाचा-मंदिरातील पुजाऱ्यात संचारला राक्षस; धारदार तलवारीने सुनेचे छाटले दोन्ही हात
वडिलांशिवाय काका, काकू, आजोबा, आजी यांनी देखील आईला मारहाण केली आहे. यातच तिचा मृत्यू झाल्याची माहिती मुलांनी पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीसह सासू सासऱ्यांना अटक केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असता, पोलिसांना घराजवळील एका टाकीत रक्ताने माखलेले कपडे सापडले आहेत. तसेच रक्ताचे डाग पुसण्यासाठी आरोपीनं घटनास्थळी रॉकेल टाकलं होतं. त्याचे पुरावेही पोलिसांना मिळाले आहेत.
हेही वाचा-खाली पाडत नाक दाबून तोंडात ओतलं विष, निवृत्त पोलिसासोबत सुनेचं अमानुष कृत्य
प्राथमिक माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी पती संजय राऊत याच्यासह वडील विशिष्ट राऊत आणि त्याची आई उत्तम देवी यांना अटक केली आहे. या गुन्ह्यातील अन्य आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. देशारी पोलीस फरार आरोपींचा शोध घेत असून घटनेचा तपास केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Crime news, Murder