पुणे, 23 मार्च : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सचिन दोडके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोडके यांनी मारहाण तसेच शिवीगाळ करून धमकी दिल्याची माहिती आहे. या प्रकरणातून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोडके यांच्यासह 5-6 कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
वारजे पोलीस ठाण्यात भाजपचे कार्यकर्ते वासुदेव भोसले यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली आहे. पुणे शहरातील वारजे भागात गेल्या अनेक वर्षांपासून सचिन दोडके नगरसेवक आहेत.
हृदयद्रावक! तरुण मुलगा गमावला अन् जगण्यातली आस संपली, मातेनं उचललं टोकाचं पाऊल
फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन दिवसांपूर्वी मंगळवारी (दि.21) संध्याकाळी 7.30 वाजता वारजे भागात असलेल्या आरएमडी कॉलेज ते साई सयाजी नगर येथे एक अंडरपस (बोगदा) आहे.
त्या ठिकाणी खडकवासला लोकसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या निधीतून काही काम चालू आहे. यावेळी त्याठिकाणी सचिन दोडके, संजय दोडके आणि त्यांचे इतर कार्यकर्ते पोहचले.
गुढी पाडव्यादिवशीच झाला घात, पुण्यातील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू तर 11 गंभीर जखमी
त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. यातच संजय दोडके यांनी हातात बांबू घेऊन फिर्यादी यांच्या अंगावर जाऊन जिवे मारण्याची धमकी दिली. तिथे सुरू असलेल्या कामगारांना सुद्धा मारहाण केल्याचा आरोप फिर्यादी यांनी केला आहे. सचिन दोडेक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे निकवर्तीय म्हणून देखील ओळखले जातात.
सचिन दोडके हे मागील अनेक वर्षांपासून वारजे परिसरात नगरसेवक आहे. सचिन दोडेक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय म्हणून देखील ओळखले जातात. त्यामुळे त्यांनी नेमकी का मारहाण केली? याचा तपास पोलीस करत आहे. मात्र राजकारणाऱ्यांनीच अशा प्रकारे दहशत निर्माण केल्यास लोकप्रतिनिधींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Crime news, NCP, Pune, Pune (City/Town/Village)