पुणे, 15 जानेवारी : विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. मागच्या काही दिवसांमध्ये कोयता गँगने पुण्याच्या रस्त्यावर धुमाकूळ घातला होता, यामध्ये काही जण जखमीही झाले. कोयता गँगनंतर आज पुण्यामध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली. कोयता घेवुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आला आहे. गोरे बुद्रुक तालुका हवेली पुणे खडकवासला धरणाच्या पुढे ही धक्कादायक घटना घडली. सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथील माळवाडी येथे गाडी हळू चालवा, असे सांगितल्याने काही सराईतांनी हातात कोयते व तलवार घेऊन दहशत माजवविण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या सराईतांनी संबंधित महिलेलाही मारहाण केली असून लहान मुलाच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. गोऱ्हे बुद्रुक येथील माळवाडी येथे सायंकाळी महिला आपल्या घरासमोर बसली होती व लहान मुले बाहेर खेळत होती. रस्त्यावरुन दुचाकीवरून काही तरुण वेगाने ये-जा करत होते. महिलेने मुलं खेळत असल्याने दुचाकीस्वारांना हळू गाडी चालवा म्हणून सांगितले असता त्याचा राग धरुन त्या तरुणांनी महिलेला मारहाण केली. त्यानंतर पुन्हा काही वेळात हातात तलवार व कोयते घेऊन ते तरुण इतरांना सोबत घेऊन आले व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करु लागले.
Video : पुण्यात कोयता गँगची पुन्हा दहशहत, गाडी हळू चालवा सांगितल्याने..#pune #crime pic.twitter.com/6tZv3EnDdl
— News18Lokmat (@News18lokmat) January 15, 2023
या घटनेचा व्हिडिओ परिसरात व्हायरल झाला असून संबंधित तरुण हे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. दरम्यान गावातील एका दुकानदाराकडून फुकट सिगारेट घेण्यासाठी या सराईतांनी त्याला धमकावल्याचीही महिती मिळाली आहे. गांजाची नशा करुन हे सराईत सातत्याने गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात, अशी माहिती एका संतप्त नागरिकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे.
हेही वाचा - लग्नाचे आमिष देऊन 23 वर्षीय वार्डबॉयचे 30 वर्षाच्या नर्ससोबत धक्कादायक कृत्य, सतत दोन वर्ष… हातात तलवार घेऊन दहशत निर्माण केल्याची व इतर माहिती मिळाली आहे. तातडीने आरोपींना पकडण्यासाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. अशा समाजकंटकांना धडा शिकविण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येणार आहे.", अशी माहिती पुणे ग्रामीणमधील हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली आहे. आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. या घटनेनंतर हवेली पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. खडकवासला नजीकच्या गावात गावगुंडांनी कोयता नाचवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पाठवण्यात आले आहे, अशी माहिती हवेली पोलीस स्टेशनचे पीआय सदाशिव शेलार यांनी न्यूज 18 लोकमतला दिली.