जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / लग्नाचे आमिष देऊन 23 वर्षीय वार्डबॉयचे 30 वर्षाच्या नर्ससोबत धक्कादायक कृत्य, सतत दोन वर्ष...

लग्नाचे आमिष देऊन 23 वर्षीय वार्डबॉयचे 30 वर्षाच्या नर्ससोबत धक्कादायक कृत्य, सतत दोन वर्ष...

file photo

file photo

ओळखीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले. या दरम्यान युवकाने महिलेला लग्नाचे आमिष दिले. यानंतर दोघेजण एकाच रूममध्ये राहू लागले.

  • -MIN READ Bid,Maharashtra
  • Last Updated :

बीड, 15 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच आता लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बीडच्या माजलगाव शहर ठाण्यात नर्सच्या फिर्यादीवरून वार्ड बॉयवर ॲट्रॉसिटी व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - बीडच्या माजलगांव शहरातील एका खासगी रुग्णालयात नोकरी करत असलेल्या एका नर्स महिलेला लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षे बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात एका युवकाविरुद्ध ॲट्रॉसिटी व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 वर्षीय एक विवाहित महिला नर्स म्हणून कार्यरत होती. तिच्यासोबत या रुग्णालयात वार्ड बॉय म्हणून कार्यरत असलेल्या दादासाहेब तौर (वय-23 वर्षे) याची आणि पीडित महिलेची ओळख झाली. त्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले. या दरम्यान युवकाने महिलेला लग्नाचे आमिष दिले. यानंतर दोघेजण एकाच रूममध्ये राहू लागले. या कालावधीत त्याने तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवत तिच्यावर बलात्कार केला. हेही वाचा -  Aurangabad Murder Case : बंद पडलेल्या कंपनीत भयानक कांड, 20 वर्षीय तरुणाचे आधी सापडेल शीर, मग… पीडित महिला वारंवार लग्न करण्याची मागणी करत होती. मात्र, आरोपी दादासाहेब हा लग्नास टाळाटाळ करू लागला. यामुळे पीडित महिलेने माजलगाव शहर पोलिसात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून आरोपी दादासाहेब तौर याच्याविरोधात बलात्कार व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: beed , crime news , Rape
  • First Published :
जाहिरात
जाहिरात