पुणे, 14 जानेवारी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त हद्दीतील दिघी पोलीस स्टेशनमध्ये एका तरुणाचा मृतदेह नातेवाईकांनी पोलीस स्टेशन समोर आणून ठेवला आहे. पोलीस स्टेशनच्या दारात मृतदेह ठेवून नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. दिघी पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांच्या दबावामुळे वृषभ मुकुंद जाधव ह्या तरुणाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.
वृषभ मुकुंद जाधव याचा त्याच्या पत्नीसोबत घटस्फोटाची केस सुरू होती घटस्फोटाचा निकाल वृषभ मुकुंद जाधव यांच्या विरोधात लागला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या घरी येऊन त्याच्यावर दबाव टाकल्याने त्याला हृदय विकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाला असा आरोप त्याच्या नातेवाईकानी केला आहे. ज्या पोलिसांनी वृषभ जाधववर दबाव टाकला त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्याच्या नातेवाईकांनी केली आहे.
हे ही वाचा : पहिली पत्नी पोहोचली लग्न मंडपात अन् पतीचा दुसऱ्या लग्नाचा डाव फसला, VIDEO
पुण्यात 24 तासात दोन घटना
आर्थिक कारणातून झालेल्या वादात एका मित्राने दुसर्या मित्राच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यानंतर दोरीने गळा आवळून त्याचा खून करण्यात आला आहे. राहुल बबन दांगट (वय 46, रा. आंबेगाव बुद्रुक) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सुशांत नारायण आरुडे (वय 30, रा. चिंतामणी अपार्टमेंट, फालेनगर, आंबेगाव बुद्रुक) याला अटक केली आहे. याबाबत राहुलचा भाऊ विकास बबन दांगट (वय 42) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसानी आरुडे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.13) पॉकेट कार्नर, आंबेगाव बुद्रुक येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत आणि राहुल हे दोघे एकमेकांचे मित्र होते. राहुल हे त्यांचे आर्थिक व्यवहार सुशांत यांच्यामार्फत करत होते, तसेच त्यांचे क्रेडिट कार्डदेखील सुशांतच चालवत होता. काही दिवसांपूर्वी राहुल यांनी एका ठिकाणी गुंतवणूक केली होती. ते पैसे त्यांना परत मिळत नव्हते. राहुल हे सुशांतमार्फत आर्थिक व्यवहार करत असल्यामुळे त्यांना संशय होता.
हे ही वाचा : 65 वर्षाच्या वृद्धाचा मेहुण्याच्या पाच वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; एक फोन कॉल अन्..
राहुल यांनी दोघांच्या आर्थिक व्यवहाराबाबत त्यांचा भाऊ विकास यांना माहिती दिली होती. सुशांत याने राहुल यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यानंतर नायलॉनच्या दोरीने गळा आवळला. गंभीर जखमी झाल्याने राहुल यांचा जागीच मृत्यू झाला. सुशांत यांच्या पत्नीने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला होता. त्यानुसार बीट मार्शलनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी राहुल हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Police, Pune, Pune (City/Town/Village), Pune crime, Pune crime branch