पुणे, 29 सप्टेंबर : आपले वडील आपल्यासाठी काय असतात हे एका मुलीपेक्षा जास्त कोण समजू शकतं! अर्थात मुलांनादेखील आपल्या वडिलांच्या संवेदनशील स्वभावाची जाणीव असते. पण मुलगी आणि पित्याचं नातंच वेगळं असतं. मुलीसाठी पिता म्हणजे तिचं विश्व असतो. या पवित्र नात्याची कोणत्याच नात्यासोबत तुलना होऊ शकत नाही. पण पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पित्याने आपल्या पोटच्याच लेकीची हत्या केली आहे. नराधन पित्याची इतकी हिंमत नेमकी कशी झाली असेल? असा सवाल या घटनेनंतर उपस्थित होतोय. विशेष म्हणजे मुलगी अवघ्या सात वर्षांची होती. पित्याने आपल्या हातांनी तिला नदीपात्रात ढकलून दिलं, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील बजरंगवाडी येथे संबंधित धक्कादायक घटना घडली आहे. बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या दुर्दैवी घटनेवर अनेकांकडून संताप व्यक्त केला जातोय. आरोपी बापाने मुलीला नदीपात्रात फेकून दिलं. त्यानंतर आपली मुलगी हरवल्याची तक्रार त्याने पोलीस ठाण्यात केली. कुणाचाही विश्वास बसणार नाही, असं त्याने नाटक केलं. पण पोलिसांनी आरोपी बापाची कसून चौकशी केली असता त्यानेच आपल्या लेकीची हत्या केल्याचं उघड झालं. ( नवी मुंबईत तरुणाला चौघांकडून प्रचंड मारहाण, धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, पाहा VIDEO ) अतिशय धक्कादायक ही घटना आहे. आरोपीने आपल्या पोटच्या लेकीची हत्या का केली? या प्रश्नाचं उत्तर अद्याप समोर आलेलं नाही. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. आरोपीची कसून चौकशी केल्यानंतर खरं कारण समोर येईल. पण या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. आरोपीला आपल्या लेकीची दया आली नाही का? पोटच्या लेकीला संपवून त्याला काय मिळालं? तिला नदीपात्रात फेकून तिला तडफडत तिचा अंत व्हावा, असा विचार आरोपीने का केला होता? असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी तपास केल्यानंतर आरोपीने आपल्या सख्ख्या लेकीची हत्या केल्याचं उघड झालं. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने आरोपी बापाला बेड्या ठोकल्या. युवराज सोळुंके असं आरोपी पित्याचं नाव आहे. मुलीचा मृतदेश शोधण्याचं काम सुरु आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी पुणेकरांकडून केली जातेय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.