प्रमोद पाटील, नवी मुंबई, 29 सप्टेंबर : नवी मुंबईत एका तरुणाला त्याच्या कार्यालयात घुसून प्रचंड मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अतिशय अचूकपणे कैद झाली आहे. पैशांच्या वादातून हा भयानक राडा घडल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे तरुणाला किती भयानक पद्धतीने मारहाण करण्यात आली ते समोर आलं आहे. नवी मुंबईतील खैरणे बोनकोडे गावात पैसे परत न दिल्याने चार जणांनी एका व्यक्तीला कार्यालयात घुसून मारहाण केली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित तरुण एका रियल इस्टेट ऑफिसमध्ये बसला आसतना आरोपींनी त्याला मारहाण केली. त्यांनी आरोपींना मारहाण केली. तसेच आरोपींच्या कार्यालयाचीदेखील तोडफाड केली. खरंतर पीडित तरुणाकडे आरोपींचे चार हजार रुपये होते. ते पैसे आरोपींनी तरुणाकडे अनेकवेळा मागितले होते. पण आरोपीने ते देण्यास अनेकदा टाळाटाळ केली. त्यामुळे त्याचा राग मनात घेवून चार जण ऑफिसमध्ये घुसले आणि त्यातील दोघांनी फिर्यादीस शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी एकाने बाजूला आसलेल्या फरशी पुसण्याचा वायफर घेऊन हल्ला केला. तर दुसऱ्याने लोखंडी सलईने हल्ला चढवला. आरोपी मारत असताना फिर्यादी त्यांच्याशी काही बोलण्याचा प्रयत्न करत होता. मात्र आरोपी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यांनी फिर्यादीवर हल्ला सुरूच ठेवला. परत जाताना आरोपींनी फिर्यादी यांना पोलीस ठाण्यात न जाण्याची धमकीही दिली.
( जगातील 5 सर्वात मोठे बँक दरोडे, चित्रपटालाही लाजवेल असं प्लॅनिंग ) पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी या घटेविषयी सविस्तर माहिती दिली. “काल कोपरखैरणे पोलीस ठाणे हद्दीतील खैरणे गावात बालाची रिअल इस्टेट ऑफिसमध्ये काशीम असीम सलमानी हा कर्मचारी बसला होता. त्याठिकाणी इस्टेट एजंटचे काम करणारे आरोपी फैस जाफर पटेल, सुफियान दिवाण, इफाज पटेल आणि ताहीर पटेल हे आले. त्यांनी काशीमला चार हजार रुपये दिलेले होते. त्यासाठी त्यांनी एक-दोन वेळा फोनवरुन पैसे मागितले होते. पण काशीमने पैसे दिले नव्हते. या रागातून आरोपींनी काशीमच्या कार्यालयात जावून कार्यालयाची तोडफोड केली. तसेच काशीमला लोखंडी रॉडने मारहाण केली. आरोपींना अटक करण्यासाठी आम्ही दोन पथक तयार केले आहेत. ते आरोपींना अटक करणार आहेत. आरोपींना अजून ताब्यात घेतलेलं नाही. पण त्यांच्या मागावर आमच्या दोन टीम आहेत. कमल ३२६, ३२३, ४२७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे”, अशी माहिती उपायुक्त पानसरे यांनी दिली.