लखनऊ 29 डिसेंबर : तंबाखूच्या पुडीने एका हत्याकांडाचा खुलासा केल्याची घटना समोर आली आहे. 27 नोव्हेंबर रोजी बस्ती वाल्टरगंज पोलीस ठाण्याच्या बाकसई गावात नदीच्या काठावर एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. महिनाभरानंतर पोलिसांनी या खुनाचा खुलासा केला. हत्येचा आरोप असलेला पती राकेश शर्मा याला पोलिसांनी अटक केली आहे. गुडिया असं मृत महिलेचं नाव आहे.
पोलिसांना घटनास्थळावरून G-55 मार्क असलेलं तंबाखूचं पाऊच सापडलं. पोलिसांनी तंबाखूच्या पुडीचा तपास सुरू केला असता, समजलं की ही जुन्या टाउनशिपमध्ये बनते, जिचा सप्लाय संतकबीरनगर जिल्ह्यातील दुधारा, बखिरा आणि बस्ती पोलीस स्टेशनच्या रुधौली परिसरात केला जातो. पोलिसांनी त्या भागात मृताची ओळख पटवण्यासाठी पोस्टर लावले. मृत महिलेची आई सविता यांनी पोस्टर पाहिल्यानंतर आपल्या मुलीची ओळख पटवली आणि तक्रार दिली.
प्रेमविवाहानंतर पहिल्याच रात्री समोर आलं पत्नीचं धक्कादायक सत्य, नवरदेवाची थेट पोलिसांत धाव
मृत महिलेच्या आईने सांगितलं की, तिच्या मुलीचं लग्न रुधौली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हटवा मार्केटमधील राकेश शर्मासोबत झालं होतं. लग्नानंतर तिचा जावई अनेकदा मुलीला मारहाण करत असे. पोलिसांनी मयत महिलेच्या पतीची चौकशी सुरू केली असता खुनाचा प्रकार उघडकीस आला.
आरोपीने सांगितलं की 'पत्नीला अंमली पदार्थांचं व्यसन होतं आणि अनेकदा ती घरातून पळून जायची. ती कोणाच्याही घरी मागून अन्न खायची, त्यामुळे समाजात माझी खूप बदनामी व्हायची. २६ नोव्हेंबरला मी मुलांना तिच्या माहेरून आणलं होतं. बर्याच विनंतीनंतर ती माझ्यासोबत आली, त्यानंतर मी खूप अस्वस्थ झालो. त्यानंतर मी मुलांना घरी सोडून हादिया येथे गेलो तेथे मी दारू प्यायली, त्यानंतर मी दुचाकीवरून निर्जनस्थळी गेलो. तिथे विटेने पत्नीच्या डोक्यात वार करून तिचा खून केला. डोकं ठेचल्यानंतरही ती जिवंत असण्याची शक्यता पाहून गळाही ब्लेडने कापला. माझ्यावर खुनाचा संशय येऊ नये म्हणून घटनेच्या तीन दिवसांनंतर मी रुधौली पोलीस ठाण्यात माझी पत्नी हरवल्याची तक्रार नोंदवली.'
प्रेयसीसाठी पुण्याच्या आजोबांचा कारनामा, खून करून बॉडीला घातले स्वत:चेच कपडे, दहावाही उरकला!
या हत्याकांडाचा खुलासा झाल्यावर एसपी आशिष श्रीवास्तव म्हणाले की, या हत्याकांडाचा खुलासा करणं आमच्यासाठी आव्हान होतं. घटनास्थळी G-55 तंबाखूचे पाऊच सापडले. याच पुराव्यानिशी हे खून प्रकरण उघडकीस आले. आरोपीविरुद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder