हरिद्वार 29 डिसेंबर : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो. मात्र, काहीवेळा लग्नाच्या नावाखाली लोकांसोबत असं काही घडतं, जे त्यांना हादरवणारं असतं. अशी एक घटना आता हरिद्वार इथून समोर आली आहे. प्रेमविवाहानंतर नवरा-बायकोचं भांडण, विवाहबाह्य संबंध आणि इतर कारणांमुळे लग्न मोडल्याचं तुम्ही अनेकदा ऐकलं किंवा पाहिलं असेल. मात्र आता समोर आलेली घटना अतिशय अजब आहे. तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, शरीरसंबंध ठेवले, नको त्या अवस्थेत शूट; मग सुरू झालं.. हरिद्वारच्या लक्सरमध्ये पत्नीचं जेंडर समजताच पतीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. ज्या तरुणीसोबत लग्न करून तो घरी घेऊन आला होता, ती ट्रान्सजेंडर असल्याचं समोर आलं. दरगाहपूर येथील 30 वर्षीय सुखलाल नावाच्या तरुणाची सोशल मीडियावर हरियाणाच्या एका तरुणीसोबत मैत्री झाली होती. पुढे दोघांचं बोलणं वाढलं. यानंतर दोघांची मैत्री प्रेमात बदलली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी कुटुंबीयांची परवानगी घेत लक्सर येथील राधा कृष्ण मंदिरात लग्न केलं. मात्र लग्नाच्या पहिल्या रात्रीच तरुणाला समजलं की त्याची पत्नी ट्रान्सजेंडर आहे आणि ती मुलापासून मुलगी बनली आहे, तेव्हा त्याला धक्का बसला. आपल्या पत्नीची सत्य समजताच तो हादरला. यानंतर दोघांमध्ये भांडणही झालं. यानंतर पत्नी आपल्या घरी हिसार येथे परत गेली. विवाहित प्रेयसीसोबत प्रियकराचं भयानक कृत्य, स्वत:ही उचललं टोकाचं पाऊल लक्सर येथे तक्रार देताना तरुणाने सांगितलं की, त्याची पत्नी आरुषी हिचं नाव आधी आशु होतं आणि ती एका मुलापासून मुलगी झाली आहे. घटस्फोट देण्याच्या बदल्यात आरुषीच्या कुटुंबाने मोठ्या रकमेची मागणी केल्याचा आरोपही तरुणाने केला आहे. तरुणाच्या तक्रारीवरून आरुषी आणि तिच्या कुटुंबियांविरुद्ध लक्सर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवालीचे प्रभारी निरीक्षक अमरजीत सिंह यांनी सांगितलं की, फसवणुकीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.