आळंदी, 27 डिसेंबर : प्रेयसीसाठी अगदी काहीही करायला तयार असणारे प्रियकर आपण फक्त चित्रपटच नाही तर खऱ्या आयुष्यातही बघतो. पुण्याच्या आजोबांनी मात्र प्रियसीसोबत राहण्यासाठी भलताच कारनामा केला आहे, ज्यामुळे त्यांना जेलची हवा खायला लागत आहे. प्रेयसीसोबत राहण्यासाठी स्वत:च्या खुनाचा बनाव 65 वर्षांच्या या व्यक्तीने केला आहे. यासाठी त्याने एका व्यक्तीचा खून केला, तसंच त्याचं शीरही धडावेगळं केलं. या मृतदेहाला त्याने स्वत:चे कपडे घातले.
खून करून आणि डेडबॉडीला स्वत:चेच कपडे घालून हा नराधम थांबला नाही, तर त्याने हा मृतदेह पुन्हा रोटर मशिनमध्ये फिरवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी सुभाष उर्फ केरबा छबन थोरवे नावाच्या व्यक्तीस अटक केली आहे. 10 दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेत रवींद्र भीमाजी घेनंद नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे खून केल्यानंतर आरोपी फरार झाला होता, तसंच त्याच्यावर मृत्यूनंतर केले जाणारे सगळे विधीही करण्यात आले. अगदी दशक्रिया विधीच्या कार्यक्रमाचे बॅनरही गावात लावण्यात आले आणि दशक्रिया विधीही उरकला गेला.
पोलिसांना त्यांच्या खबऱ्याकडून सुभाष उर्फ केरबा छबन थोरवे जिवंत असल्याचं समजलं. यानंतर पोलिसांनी तपास केला आणि सुभाष थोरवेला अटक करण्यात आली. याप्रकरणाचा पुढील तपास आता पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Pimpari chinchawad, Pune