जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / आधी शारीरिक संबंध ठेवले मग 51 वेळा वार करून प्रेयसीची हत्या, 1000 CCTV फुटेज तपासून पोलिसांनी शोधलं हत्येचं कारण

आधी शारीरिक संबंध ठेवले मग 51 वेळा वार करून प्रेयसीची हत्या, 1000 CCTV फुटेज तपासून पोलिसांनी शोधलं हत्येचं कारण

आधी शारीरिक संबंध ठेवले मग 51 वेळा वार करून प्रेयसीची हत्या, 1000 CCTV फुटेज तपासून पोलिसांनी शोधलं हत्येचं कारण

आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी 1000 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची झडती घेतली. त्यानंतर त्याचं बँक खातं तपासण्यात आलं. love triangle मुळे या तरुणीची हत्या झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

रायपूर 02 जानेवारी : हत्येच्या आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र यातील काही घटना इतक्या भयानक असतात, ज्या संपूर्ण देशाला हादरवून सोडतात. अशीच एक घटना छत्तीसगडच्या कोरबामधूनही समोर आली होती. ज्यात एका 20 वर्षीय तरुणीची अतिशय निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती. तिचा मृतदेह घराच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात आढळला होता. शवविच्छेदन अहवालात समोर आलं, की आरोपीने 51 वेळा धारदार शस्त्राने या तरुणीच्या शरीरावर वार केले होते. चाकात अडकलेली तरुणी, यू-टर्न घेताना दिसली कार…पहाटे नेमकं काय घडलं? नव्या सीसीटीव्ही VIDEO मधून मोठा खुलासा याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला राजनांदगाव येथून अटक केली आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी 1000 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची झडती घेतली. त्यानंतर त्याचं बँक खातं तपासण्यात आलं. love triangle मुळे या तरुणीची हत्या झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. आरोपीच्या बँक डिटेल्सवरून पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

पोलिसांनी सांगितलं की, घटनेनंतर आरोपी अहमदाबादला गेला होता. खून करण्यापूर्वी त्याने तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवले होते. या खून प्रकरणाच्या तपासात आरोपीने आधी उशीने तोंड दाबून तरुणीचा जीव घेतला असल्याचं निष्पन्न झालं आहे. यानंतर मृतदेहावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. आरोपीने मुलीच्या छातीवर, गळ्यावर, चेहऱ्यावर आणि पाठीवर अनेक वार केले होते. तरुणी प्रेमात झाली आंधळी, बॉयफ्रेंडसाठी स्वत:च्या आईसोबत केलं भयानक कांड पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मुलीच्या छाती, गळा, चेहरा आणि पाठीवर एकूण 51 खोल जखमा असल्याचे समोर आले आहे. या घटनेदरम्यान, तरुणीने बचावासाठी धडपडही केली, त्यामुळे तिच्या हाताला धारदार शस्त्राने दुखापत केली गेली. आवाज करू नये म्हणून आरोपीने तरुणीचं तोंड उशीने दाबलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात