मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /तरुणी प्रेमात झाली आंधळी, बॉयफ्रेंडसाठी स्वत:च्या आईसोबत केलं भयानक कांड

तरुणी प्रेमात झाली आंधळी, बॉयफ्रेंडसाठी स्वत:च्या आईसोबत केलं भयानक कांड

पूनम तिचा प्रियकर सोनू ओझा याच्यासोबत दोनदा पळून गेली होती.

पूनम तिचा प्रियकर सोनू ओझा याच्यासोबत दोनदा पळून गेली होती.

पूनम तिचा प्रियकर सोनू ओझा याच्यासोबत दोनदा पळून गेली होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Gwalior, India

ग्वाल्हेर, 2 जानेवारी : संपूर्ण शहर जेव्हा 2022 ला निरोप आणि नवीन वर्षाच्या आगमनाच्या जल्लोषात मग्न होते. याचवेळी ग्वाल्हेरमध्ये एक भयानक घटना घडली. प्रियकराच्या मदतीने आपल्याच आईची एका मुलीने हत्या केली. प्रेमात अडथळा ठरल्याने तिने हे पाऊल उचचले.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

ममता असे मृत महिलेचे नाव आहे. ती येथे भाड्याच्या घरात राहत होती. तिचा मृतदेह घरातील पलंगाखाली ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी आरोपी मुलीला अटक करण्यात आली आहे. तसेच तिने आपला गुन्हा कबूल केला असून या हत्येचे कारणही तिने सांगितले. तिचे एका तरुणावर प्रेम होते. त्या प्रेमात तिची आई अडथळा ठरत होती, त्यामुळे तिने आपल्या आईची हत्या केल्याचे सांगितले.

एसएसपी अमित सांघी यांनी सांगितले की, हजीरा भागात राहणाऱ्या ममताचा मृतदेह 31 डिसेंबरच्या रात्री घरात रक्ताने माखलेला आढळला होता. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता, मृत महिलेची मुलगी पूनम ही पळून गेली होती. प्रेमी युगुलाने महिलेची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून पलंगाखाली ठेवला. तसेच घटनास्थळावरुन पळ काढला.

हेही वाचा - Love Marriage नंतर पत्नीवर संशय, रागाच्या भरात दोन दिवसांच्या बाळासोबतही भयानक कृत्य

आधीही प्रियकरासोबत पळून गेली होती पूनम -

पूनम तिचा प्रियकर सोनू ओझा (रा. लूटपूरा) याच्यासोबत दोनदा पळून गेली होती. त्यामुळे पोलिस आधी सोनूच्या घरी पोहोचले. सोनूही येथून बेपत्ता होता. त्यानंतर पोलिसांनी ममताच्या घराभोवती लावलेल्या कॅमेऱ्यांची तपासणी केली. कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये पूनम घाईघाईने घरातून निघताना दिसत होती, मात्र ती परत आली नाही. त्यानंतर त्याचा शोध सुरू करण्यात आला. दोन्ही आरोपींना पकडल्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली. पोटच्या मुलीनेच प्रियकरासाठी आपल्या आईची हत्या केल्याच्या या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: Daughter, Love story, Mother killed, Murder