जाहिरात
मराठी बातम्या / Viral / चाकात अडकलेली तरुणी, यू-टर्न घेताना दिसली कार...पहाटे नेमकं काय घडलं? नव्या सीसीटीव्ही VIDEO मधून मोठा खुलासा

चाकात अडकलेली तरुणी, यू-टर्न घेताना दिसली कार...पहाटे नेमकं काय घडलं? नव्या सीसीटीव्ही VIDEO मधून मोठा खुलासा

चाकात अडकलेली तरुणी, यू-टर्न घेताना दिसली कार...पहाटे नेमकं काय घडलं? नव्या सीसीटीव्ही VIDEO मधून मोठा खुलासा

Delhi Sultanpuri girl case new cctv video : या प्रकरणाचा आता नवीन सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये मुलगी बलेनो कारखाली अडकलेली दिसत आहे आणि कार चालक तिला कारसोबतच ओढून यू-टर्न घेताना दिसत आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली 02 जानेवारी : देशाची राजधानी दिल्ली नवीन वर्षाच्या स्वागतात मग्न असतानाच शहरात एक अतिशय भयानक घटना घडली. यात दारूच्या नशेत पाच तरुणांनी बलोनो कारमधून तरुणीला 10 किमी फरफटत नेल्याचं समोर आलं. 10 किमी फरफटत नेल्यामुळे पीडित मुलीची सगळी हाडं तुटली आणि तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा आता नवीन सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये मुलगी बलेनो कारखाली अडकलेली दिसत आहे आणि कार चालक तिला कारसोबतच ओढून यू-टर्न घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी एफआयआरमध्ये सदोष मनुष्यवधाचं कलम जोडलं आहे. दरम्यान, ज्या बलेनो कारने या तरुणीला फरफटत नेलं, तिचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. सीसीटीव्ही 1 जानेवारीच्या पहाटे 3वाजून 34 मिनिटांचा आहे. कंझावलाच्या लाडपूर गावापासून थोडं पुढे, वाहन यू-टर्न घेत तोसी गावाकडे परत जाताना दिसतं. यात गाडीसोबतच तरुणीचा मृतदेहही दिसतो. 10 किमी फरफटत नेल्यानं महिलेची सगळी हाडं तुटली, तरी..; दिल्ली अपघाताचा थरकाप उडवणारा CCTV VIDEO कारने पुढे गेल्यावर यू-टर्न घेतल्याचे प्रत्यक्षदर्शी दीपकने सांगितले. दीपकने सांगितले की, गाडी नॉर्मल स्पीडमध्ये होती आणि ड्रायव्हर नॉर्मल असल्याचं दिसत होतं. पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास दीपक दूध डिलिवरीसाठी वाट पाहत असताना त्याला एक कार येताना दिसली. त्या गाडीच्या मागच्या चाकांमधून मोठा आवाज येत होता. नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर, दिल्ली पोलिसांनी एफआयआरमध्ये सदोष मनुष्यवधाचे कलम जोडले. दिल्ली आऊटरचे डीसीपी हरेंद्र सिंह सांगतात, की सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले जाईल, त्यांनी दारू प्यायली होती की नाही याची पुष्टी करण्यासाठी आरोपींच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत. पोस्टमार्टमसाठी बोर्ड तयार करण्याची विनंती करण्यात आली आहे. तीन डॉक्टरांचे पथक शवविच्छेदन करणार आहे.

जाहिरात

डीसीपी हरेंद्र सिंह यांनी सांगितलं की, अटक केलेल्या पाच मुलांनी सांगितलं की मुलगी गाडीखाली अडकली होती, त्यामुळे आम्हाला ते समजलं नाही. सध्या, या तरुणांनी मुलीला गाडीसोबत 4-5 किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याची पुष्टी झाली आहे, परंतु दिल्ली पोलीस पुन्हा गुन्ह्याच्या ठिकाणाची पाहणी करणार आहेत. आरोपींना जामीन मिळू नये म्हणून दिल्ली पोलीस आपल्या कायदेशीर टीमच्या संपर्कात आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

डीसीपी हरेंद्र सिंह यांचा दावा आहे की, दिल्ली पोलिसांच्या पेट्रोलिंग पार्टीने सर्वप्रथम स्कूटी पाहिली पण पीडित महिला घटनास्थळी सापडली नाही. दुसरीकडे, दिल्ली पोलिसांचा आरोप आहे की, पीसीआर व्हॅनमध्ये उपस्थित असलेले पोलीस या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे ऐकून घेण्यात रस दाखवत नव्हते. स्कुटीवरच्या महिलेला 10 किमी फरफटत नेलं, नग्न अवस्थेत मिळाला मृतदेह, राजधानी हादरली! प्रत्यक्षदर्शी दीपकने सांगितले की, मृतदेह गाडीत अडकून होता तोपर्यंत चालक आपली गाडी इकडे-तिकडे करत राहिला. मृतदेह पडल्यावर त्यांनी तो सोडून घटनास्थळावरून पळ काढला. सुलतानपुरी भागात एसएचओने रात्रीच्या गस्तीदरम्यान स्कूटी अपघातग्रस्त स्थितीत पाहिली आणि 3.53 वाजता पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, एक करड्या रंगाची कार कुतुबगडच्या दिशेने जात असल्याची माहिती कोणीतरी कॉलवर दिली होती. त्यात एक मृतदेह लटकलेला दिसत आहे, असं सांगितलं होतं. यानंतर लगेचच बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांना सतर्क करण्यात आले. पोलिसांनी गाडीचा शोध सुरू केला. काही वेळाने पोलिसांना पीसीआरचा कॉल आला. एका मुलीचा मृतदेह रस्त्यावर पडून असल्याचे फोनवरून सांगण्यात आले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाची पाहणी केली. मुलीचा मृतदेह रस्त्यावरच पडून होता. अंगावर एकही कपडा नव्हता. रस्त्यावर ओढत नेल्याने तिचे पाय गायब झाले होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी एसजीएम हॉस्पिटल मंगोलपुरी येथे पाठवला, मृतदेह शवागारात ठेवण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात