Home /News /crime /

नागपूर : पोलीस कारवाईतून वाचल्याच्या आनंदात हवेत गोळीबार; चौघांची थेट तुरुंगात रवानगी

नागपूर : पोलीस कारवाईतून वाचल्याच्या आनंदात हवेत गोळीबार; चौघांची थेट तुरुंगात रवानगी

एकाने आनंदाच्या भरात आपल्याजवळील रिवॉल्वरमधून हवेत दोन राऊंड फायर केले (Man Firing into Air). गोळ्यांच्या आवाजामुळे परिसरातील नागरिक घाबरले आणि तिथे दहशतीचं वातावरण निर्माण झालं.

    नागपूर 02 जुलै : पोलिसांच्या कारवाईतून वाचल्याचा आणि आपला रेती ट्रान्सपोर्टचा ट्रक पोलिसांच्या तावडीतून परत मिळाल्याचा आनंद साजरा करणाऱ्या चौघांनी असं काही केलं की त्यांची थेट तुरुंगात रवानगी झाली. या घटनेत चौघांनी रस्त्याच्या कडेल आपली कार उभा करत तिथेच नाचण्यास सुरुवात केली. यानंतर यातील एकाने आनंदाच्या भरात आपल्याजवळील रिवॉल्वरमधून हवेत दोन राऊंड फायर केले (Man Firing into Air). गोळ्यांच्या आवाजामुळे परिसरातील नागरिक घाबरले आणि तिथे दहशतीचं वातावरण निर्माण झालं. पुराव्यासाठी कोर्टात आणलेल्या बॉम्बचा ब्लास्ट, परिसर हादरलं; अनेक पोलीस गंभीर जखमी या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी पळण्याच्या बेतात असलेल्या या चौघांनाही अटक केली. संबंधित घटना ही गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उत्कर्षनगर टर्निंग ग्रीन व्हीव अपार्टमेंटसमोर घडली. ही घटना गुरुवारी रात्री उशिरा घडल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आलोक अरुणकुमार शुक्ला, दीपक विद्यासागर चौधरी, राजू लक्ष्मण कडू आणि कार्तिकेय नरेंद्र दशसहस्र यांचा समावेश आहे आलोक आणि कार्तिकेय यांचा वाळू ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी मौदा पोलिसांनी आलोकचा वाळूने भरलेला ट्रक जप्त केला होता. कार्तिकेयने उच्च न्यायालयात वकीली करीत असलेले राजू कडू यांच्याशी आलोकची ओळख करून दिली. पोलिसांच्या कारवाईवर तोडगा काढत कडू यांनी आलोकच्या ट्रकची सुटका करून दिली. ट्रकची सुटका झाल्याचा आनंद साजरा करण्याचं आरोपीने ठरवलं. यासाठी चौघंही आलोकच्या कारने कळमेश्वर मार्गावरील ढाब्यावर जात होते. महिलेने 3 निष्पाप मुलींसह उचलले भयानक पाऊल, कुटुंबीयांना माहिती मिळताच बसला धक्का आलोकच्या याच कारमध्ये परवाना असलेले त्याचे रिव्हॉल्व्हरही होते. चौघंही उत्कर्षनगर चौकात आल्यावर त्यांनी कार तिथे उभी केली आणि नाचण्यास सुरुवात केली. अतिउत्साहात आलोकने आपल्या रिव्हॉल्व्हरमधून दोन गोळ्या हवेत झाडल्या. यानंतर घाबरलेल्या नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. मात्र पोलीस येईपर्यंत आरोपी निघून गेले होते. पोलिसांनी संपूर्ण परिसरात सापळा रचून नाकाबंदी केली. यानंतर आरोपींची गाडी पोलिसांना दिसली. पोलिसांनी पाठलाग करून गाडी थांबवली. चारही आरोपी कारमध्ये होते. गोळीबारात वापरलेले रिव्हॉल्व्हरही झडतीत सापडले. चौघांना अटक करून रिव्हॉल्व्हर आणि कार जप्त करण्यात आली आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Gun firing, Nagpur News

    पुढील बातम्या