जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / पुराव्यासाठी कोर्टात आणलेल्या बॉम्बचा ब्लास्ट, परिसर हादरलं; अनेक पोलीस गंभीर जखमी

पुराव्यासाठी कोर्टात आणलेल्या बॉम्बचा ब्लास्ट, परिसर हादरलं; अनेक पोलीस गंभीर जखमी

पुराव्यासाठी कोर्टात आणलेल्या बॉम्बचा ब्लास्ट, परिसर हादरलं; अनेक पोलीस गंभीर जखमी

एका प्रकरणात पुराव्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल बॉम्ब सोबत घेऊन आला होता आणि अचानक…

  • -MIN READ
  • Last Updated :

पाटना, 1 जुलै : बिहारमधील (Bihar News) पाटना स्थित सिविल कोर्ट परिसरात बॉम्ब ब्लास्ट झाला आहे. जखमी पोलिसांमध्ये एका कॉन्स्टेबलचाही समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदमकुआन पोलीस स्टेशनच्या पोलिसांकडून स्फोटके जप्त करण्यात आली होती. ही स्फोटकं कोर्टात दाखवण्यासाठी दिवाणी न्यायालयात आणण्यात आली होती. न्यायालयाच्या आवारातील एका खोलीत ही स्फोटके ठेवण्यात आली होती. काही वेळातच खोलीत ठेवलेल्या स्फोटकाचा अचानक स्फोट झाला. मोठा आवाज होऊन चार पोलीस स्फोटाच्या झटक्यात आले. जखमींना पीएमसीएचमध्ये पाठवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू… पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लास्टनंतर गंभीर स्वरुपात जखमी कॉन्स्टेबलला रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. अन्य दोन जखमी पोलीस कर्मचाऱ्यांवरही येथेच उपचार सुरू आहे. पाटना सिव्हील कोर्टातील एका खोलीत ठेवलेली स्फोटकांचा अचानक ब्लास्ट कसा झाला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. ब्लास्टच्या आवाजाने कोर्टाच्या परिसरात खळबळ उडाली. काही वेळासाठी लोक इकडे -तिकडे पळू लागले. मिळालेल्या माहितीनुसार, एका प्रकरणात पुराव्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल बॉम्ब सोबत घेऊन आला होता. या प्रकरणात हा बॉम्ब एक पुरावा होता. मात्र यादरम्यान बॉम्ब अचानक फुटला आणि कॉन्स्टेबलदेखील या स्फोटात जखमी झाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात