Home /News /national /

महिलेने 3 निष्पाप मुलींसह उचलले भयानक पाऊल, कुटुंबीयांना माहिती मिळताच बसला धक्का

महिलेने 3 निष्पाप मुलींसह उचलले भयानक पाऊल, कुटुंबीयांना माहिती मिळताच बसला धक्का

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलीसही (Police) घटनास्थळी दाखल झाले.

  टीकमगढ, 29 जून : मध्य प्रदेशातील टिकमगड जिल्ह्यात एका महिलेने तिच्या तीन मुलींसह विहिरीत उडी मारून आत्महत्या (Woman suicide with daughters) केली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना टिकमगड (Tikamgarh MP) जिल्ह्यातील मुहारा गावात घडली. नेमकं काय घडलं - घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलीसही (Police) घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहांना शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली केली आहे. टीकमगढ जिल्ह्यातील मुहारा गावात राहणाऱ्या काशीराम कुशवाहा यांच्या पत्नी राम देवीने आपली 5 वर्षांची मुलगी उमा, 3 वर्षांची मुलगी अनुराधा आणि 8 महिन्यांच्या मुलीसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. सकाळी गावातील लोकांनी चौघांचे मृतदेह विहिरीत पाहिल्यानंतर ही घटना समोर आली. यानंतर सर्वप्रथम मृत महिलेचा पती काशीराम यांना माहिती दिली. काशीरामने आपली पत्नी आणि तीन मुलींचे मृतदेह पाहिल्यावर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आले. यानंतर त्यांना शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी काशीराम याचा त्याचा मोठा भाऊ आणि वडिलांसोबत वाद झाला होता. याबाबत तक्रार करण्यासाठी काशीराम आपल्या वडिलांसोबत जतारा पोलीस ठाण्यात गेला होता. सोमवारी रात्री उशिरा तो घरी परतला. मात्र, यावेळी त्याची पत्नी आणि तीन मुली गायब होत्या. त्यामुळे त्याने संपूर्ण रात्र त्यांचा शोध घेतलात. मात्र, मंगळवारी सकाळी धक्कादायक माहिती समोर आली. हेही वाचा - मैत्रिणीवरच जडला जीव, तिने बोलणे बंद केले अन् मित्राने उचलले हे विचित्र पाऊल
  या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. प्रथमदर्शनी असे दिसते की, आर्थिक विवंचनेमुळे पत्नीला तीन मुलींची चिंता सतावत होती. त्यामुळेच या महिलेने हे पाऊल उचलले असावे. मात्र, तरीही या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सखोल चौकशीनंतरच हे प्रकरण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. टिकमगडचे एसपी प्रशांत खरे सध्या या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहेत आणि सर्व तथ्यांच्या आधारे प्रकरणाचा तपास करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Crime news, Madhya pradesh, Woman suicide

  पुढील बातम्या