लखनऊ, 28 जुलै : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये मालकीणीवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या पिटबुलला नवे पालक मिळाले आहेत. लखनऊच्या पालिकेने गुरुवारी पिटबुलला त्याचा जुना मालक अमितकडे सोपवलं. अमितने त्याला एका व्यक्तीकडे सोपवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र अद्याप नव्या मालकाचं नाव आणि पत्ता गुप्त ठेवण्यात आला आहे. 14 दिवसांनंतर स्पेशन केजमध्ये ठेवल्यानंतर पिटबुलला आज पालिकेने अमितकडे सोपललं. अमितने त्याला उचलून घेत नव्या मालकाकडे रवाना केलं. यादरम्यान अमितला पिटबुलच्या नव्या मालकाविषयी विचारण्यात आलं, मात्र त्याने काहीच उत्तर दिलं नाही. पिटबुलला घरी आणू इच्छित होता अमित…. पिटबुलच्या हल्ल्यात सुशीला यांचा मृत्यू झाला. मात्र तरीही त्यांचा मुलगा अमित त्रिपाठी त्याला घरी आणू इच्छित होता. मात्र शेजारच्यांनी परवानगी न दिल्यानंतर पालिकेने पिटबूल अमितला देण्यास नकार दिला. पालिकेने सांगितलं की, शेजारच्यांच्या मानवी हक्काची काळजी घेण्यात आली आहे. यापूर्वी पिटबुलचे मालक अमितने सांगितलं होतं की, जर शेजारी आणि पालिकेने परवानगी दिली असती तर त्याने पिटबुलला घरी आणलं असतं. त्याने पुढे सांगितलं की, परिस्थितीमुळे आईचा मृत्यू झाला आहे. जाणुनबुजून नाही. शेजारच्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिटबुलने सुशीलावर हल्ला केला. यानंतर त्यांना खूप जास्त रक्तस्त्राव झाला. त्याशिवाय अमित घरी आल्यानंतर त्याने आईला रुग्णालयात नेलं. शेवटी रुग्णालयात डॉक्टरांनी सुशीलाला मृत घोषित केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.