लखनौ, 15 जुलै : लखनौमध्ये पाळीव पिटबुल जातीच्या कुत्र्याने (Pitbull Dog) मालकीणीचे लचके तोडल्याने 80 वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे त्या पिटबुलचा मालक अमित हादरून गेला आहे. तो म्हणतो की पिटबुल कुत्रा त्याच्या आईसोबत खूप प्रेमाने राहत असताना ही घटना कशी घडली हे समजत नाही. या घटनेनंतर पिटबुल कुत्रे खरोखरच इतके धोकादायक आहेत का? जगातील अनेक देशांमध्ये त्यांच्यावर बंदी आहे, अशात भारतातही बंदी (Ban on Pitbull Dog) घालावी का? असा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे. कुत्रे का पाळले जातात? कुत्रा हा प्राणी मालकाशी प्रामाणिक आणि एकनिष्ठ असल्याचे मानले जाते. त्याचवेळी जंगली कुत्र्यांच्या काही जातींबाबत असे म्हटले जाते की ते पाळण्यास योग्य नाहीत. याशिवाय घरादाराच्या सुरक्षेसाठी कुत्रे पाळणे हे एक महत्त्वाचे कारण आहे. अनेक कुत्री केवळ प्राणीप्रेम आणि प्रेमळ साथीदारांसाठी पाळली जातात. तर काही दुर्मिळ शुद्ध जातीच्या कुत्र्यांना शान दाखवण्यासाठी पाळले जातात. म्हणजे आमच्याकडे या जातीचा कुत्रा आहे वैगेरे. कोणती जात पिट बॉल हा शब्द अमेरिकेतील बुलडॉग आणि टेरियर्सच्या वंशजांच्या कुत्र्यांसाठी वापरला जातो. तर यूके सारख्या इतर देशांमध्ये, हे अमेरिकन बिट बुल टेरियर म्हणजेच एपीबीटी म्हणून ओळखले जाते. हे खरेतर कुत्र्यांच्या काही प्रजातींचे संकरित जाती मानल्या जातात. मात्र, इंग्लंडमध्ये ते बुल आणि टेरियर कुत्र्यासोबत अमेरिकन बुली प्रकाराच्या कुत्र्याच्या क्रॉसपासून तयार केले गेले आहे. अमेरिका आणि जगातील इतर अनेक देशांमध्ये असे कुत्रे त्यांच्या हल्ला करण्यांच्या वाईट सवयींसाठी कुप्रसिद्ध आहेत. हल्ला करण्यासाठी कुप्रसिद्ध पिट बुल कुत्रे हे सामान्य कुत्र्यांपेक्षा बलवान कुत्रे मानले जातात. त्यांच्याकडे खूप सक्रिय, शक्तिशाली आणि मजबूत जबडा आहे. धाडसी, निर्भय आणि लढाऊ कुत्रे म्हणून त्यांची ख्याती आहे. जगात अनेक ठिकाणी ते डॉगफाइटिंग खेळासाठी उपयुक्त मानले जातात, अमेरिकेसारख्या देशात डॉगफाइटिंगवर बंदी आल्यानंतरही या खेळाचे आयोजन केलं जातं. त्यात पिट डॉग ही पहिली पसंती आहे.
लष्करात गावठी कुत्र्यांना का नाही भाव? या जातींवरचं का लावतात डाव? हे आहे महत्त्वाचं कारण
यावर बंदी अनेक देशांमध्ये पिट बुल डॉगवर बंदी आहे हेही खरे आहे. या देशांमध्ये इंग्लंड, फ्रान्स, कॅनडा, डेन्मार्क, फिनलंड, नॉर्वे, न्यूझीलंड, इस्रायल, मलेशिया इ. याशिवाय बेल्जियम, जपान, जर्मनी, चीन, ब्राझीलच्या काही भागात निर्बंध आहेत. या देशांमध्ये पिट बुलचे संगोपन, व्यापार, प्रजनन यावर बंधने घालण्यात आली आहेत. अमेरिकेतील घटना पिट बुलची प्रतिमा आक्रमक आणि अप्रत्याशित कुत्रा म्हणून अधिक लोकप्रिय आहे. अमेरिकेतच त्यांच्याकडून आक्रमक आणि धोकादायक हल्ल्यांच्या घटनांच्या बातम्यांमुळे असा समज दृढ झाला आहे. ते किती धोकादायक आहेत याचाही एक आकडा दिला आहे. अमेरिकेतील कुत्र्यांच्या लोकसंख्येपैकी पिट बुल्सची संख्या केवळ 6 टक्के आहे, तर 68 टक्के लोक गेल्या 40 वर्षांत कुत्र्यांच्या हल्ल्याचे बळी ठरले आहेत. कुप्रसिद्ध सध्या जगभरात पिट बुल्सची प्रतिमा चांगली नाही. ते लवकर आक्रमक होतात आणि हल्ला करू शकतात. त्यांना राग आल्यावर नियंत्रण ठेवता येत नाही. पण वर्षापूर्वी त्यांची अशी प्रतिमा नव्हती हेही खरे आहे. पिट बुलला योग्य पद्धतीने हाताळले जात नाही, असंही अनेक तज्ज्ञांचे मत आहे. वास्तविक पिट बुल इतर कुत्र्यांप्रमाणे अनियंत्रित असतात, त्यांना राग येतो आणि ते इतरांना चावतात. परंतु, इतर कुत्री जितक्या धोकादायक जखमा देत नाही, तितक्या धोकादायक जखमा पिट बुल करतात, त्यामुळे पिट बुल अधिक बदनाम आहेत. या सगळ्यामागे आणखी एक कारण आहे जे अशा घटनेचे कारण बनते. त्यांचे पालनपोषण योग्य जबाबदारीने होत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यांच्याबद्दलही अनेक गैरसमज आहेत. अनेकांचा असा विश्वास आहे की ते लढण्यासाठी बनवले जातात. पण सत्य हे आहे की ते इतर कुत्र्यासारखेच धोकादायक आहेत. त्यांना योग्य उपचार आणि प्रशिक्षण देऊन ठेवले तर त्यांची प्रतिमा चांगली असल्याचेही दिसून आले आहे.