लखनौ, 13 जुलै : मोकाट कुत्र्याने माणसांवर हल्ला केल्याच्या तुम्ही अनेक बातम्या वाचल्या किंवा ऐकल्या असतील. मात्र, पाळीव कुत्र्यानेच आपल्या मालकीणीवर हल्ल्याची केल्याची घटना दुर्मिळ म्हणावी लागेल. मात्र, हा हल्ला साधासुधा नव्हता. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये पिटबुलच्या हल्ल्याची ही बातमी कोणाच्याही मनात भिती निर्माण करणारी आहे. पिटबुलने 80 वर्षीय सुशीला त्रिपाठी यांच्यावर भयानक हल्ला केला. पिटबुलने सुशीला यांच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडले, जे पिटबुलनेही खाल्ले आहे, असा शेजाऱ्यांचा दावा आहे. या पिटबुलमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण आहे. काय आहे घटना? लखनऊच्या बंगाली टोला येथील रहिवासी असलेल्या सुशीला त्रिपाठी यांच्यावर मंगळवारी सकाळी त्यांच्याच पिटबुल ‘ब्राउनी’ने हल्ला केला. निवृत्त शिक्षिका असलेल्या सुशीला त्रिपाठी नेहमीप्रमाणे त्यांच्या पिटबुल ‘ब्राउनी’ आणि लॅब्राडॉरसोबत फिरायला गेल्या होत्या. दरम्यान, सुशीला त्रिपाठी यांच्यावर पिटबुलने अचानक हल्ला केला. पिटबुलने पूर्ण ताकदीने सुशीला त्रिपाठी यांच्यावर हल्ला केला. यात त्यांच्या शरीराच्या अनेक ठिकाणी लचके तोडले. हल्ल्यानंतर पिटबुल महिलेचे मांस खात असल्याचे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे. एका शेजाऱ्याने सांगितले की, ‘किंकाळी ऐकून तो बाहेर आला तेव्हा त्याने पाहिले की पिटबुलने सुशीला त्रिपाठी यांच्यावर हल्ला केला होता आणि त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या.’ VIDEO : पोलिसांच्या समोरच दोन तरुणींची दबंगगिरी, तरुणाला धो-धो धुतले शेजारी पुढे म्हणाला, की ‘सुशीला त्रिपाठी ओरडत होत्या, आम्ही पिटबुलवर दगडफेक करायला सुरुवात केली, पण तो थांबला नाही आणि लचके तोडत राहिला. आम्ही सुमारे तासभर दगडफेक करत राहिलो, त्यानंतर त्यांनी सुशीला यांचा मृतदेह ओढून आत नेला. सुमारे तासभर कुत्रा वृद्ध महिलेचे लचके तोडत असल्याची माहिती आहे. शेजारी राहणाऱ्या नलिनी यांनी सांगितले, ‘पिटबुल इतका धोकादायक आहे की तो कधीच बाहेर पडत नव्हता. घरात राहायचा, आज जेव्हा त्याने त्याच्या मालकिनवर हल्ला केला तेव्हा आम्ही दगडफेक केली, पण तो थांबला नाही, तो तासभर त्याच्या मालकिणीवर हल्ला करत राहिला, तो नरभक्षक झाला आहे असे दिसते.’ नलिनी म्हणाल्या की, पिटबुलच्या हल्ल्याची घटना इतकी धोकादायक आहे की, आता आम्हाला भीती वाटत आहे, आम्ही दहशतीत जगत आहोत, महापालिकेने कारवाई करावी, पिटबुलला बाहेर काढावे, अशी आमची मागणी आहे. वृद्ध महिलेच्या शाळेत काम करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, सुशीला त्रिपाठी खूप अॅक्टिव्ह होत्या, जेव्हा आम्ही त्यांच्या घरी जायचो, तेव्हा कुत्रा बांधला जायचा. या प्रकरणी लखनौ महानगरपालिकेचे अधिकारी अरविंद राव यांनी सांगितले की, पिटबुलच्या मालकाला नोटीस देण्यात आली आहे, परवान्याची तपासणी केली जात आहे, जर परवाना नसेल तर मालकावर कारवाई केली जाईल, जर परवाना असेल तर मग तो रद्द करून पिटबुल जप्त केला जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.