पटना : रेल्वे स्टेशनवर जे नको तेच घडलं, अत्यंत भयंकर प्रकार समोर आला आहे. दिवस रविवारचा असला तरी बाहेर पडणाऱ्यांची गर्दी असतेच. त्यामुळे अशीच रेल्वे स्थानकात गर्दी होती. सकाळी 9 च्या आसपास अचानक स्क्रीनवर अश्लील आणि विचित्र काहीतरी सुरू झालं. त्यामुळे स्टेशन परिसरात गोंधळाचं वातावरण होतं. स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 10 इथल्या एक टीव्हीवर अचानक ब्लू फिल्म सुरू झाली. जवळपास 3 मिनिटं ही फिल्म तशीच सुरू होती. हा सगळा प्रकाराने गोंधळ तर उडालाच पण तिथल्या प्रवाशांना मोठा धक्का बसला. तिथल्या काही प्रवाशांनी तर त्याचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर पोस्ट केला. एक प्रवाशाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
हा लाजीरवाणा प्रकार बिहारमधील पटना रेल्वे स्थानकात रविवारी सकाळच्या सुमारास घडला आहे. रेल्वे स्थानकातील टीव्हीवर जाहिराती चालतात मात्र त्याऐवजी असा काहीतरी प्रकार घडल्याने रेल्वे कर्मचारी देखील घाबरले आणि तिथे खळबळ उडाली.
थोडासा वाद अन् पत्नीसह चिमुरड्यासोबत धक्कादायक कांड, मग स्वतःही उचललं भयानक पाऊलपटना जंक्शन पर शर्मनाक हरकत, टीवी पर चल रही थी ब्लू फिल्म, RPF ने दर्ज किया केस ।#BiharNews #Crime #BreakingNews #BigBreaking #BigNews pic.twitter.com/5DgA3QNEfj
— News18 Bihar (@News18Bihar) March 20, 2023
गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ) या दोघांनीही घटनेनंतर गुन्हा दाखल केला आहे. ब्लू फिल्म फक्त प्लॅटफॉर्म क्रमांक 10 टेलिव्हिजनवर का दाखवली गेली. याबाबतचं गूढं देखील आहे, या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. मात्र या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.