अनुज गुप्ता, प्रतिनिधी उन्नाव, 20 मार्च : उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका तरुणाने कुऱ्हाडीने वार करत आधी पत्नीची हत्या केली. त्यानंतर 4 महिन्यांच्या मुलीची हत्या केली. या घटनेनंतर आरोपी पतीने पत्नीच्या साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - या भीषण घटनेची माहिती लोकांनी पोलिसांना माहिती दिली, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि एस.ओ. बारसागवार खिडकीच्या मदतीने आत पोहोचले, तेव्हा आतील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. तर रात्री उशिरा अतिरिक्त एसपी शशिशेखर सिंह यांनी घटनास्थळाची पाहणी केली. अतिरिक्त एसपींनी कुटुंबीयांची चौकशी केली. त्याचबरोबर पोलिसांनी तिन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. उन्नावमधील बारसगवार पोलीस स्टेशन परिसरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. बरसगवार पोलीस स्टेशन हद्दीतील माजरा रुडी खेडा येथे मोहन कुमार नावाचा तरुण पत्नी सीमा आणि 4 महिन्यांच्या मुलीसह वेगळ्या घरात राहत होता. रात्री उशिरा मोहन आणि सीमा यांच्यात कशावरून तरी वाद झाला. त्यामुळे संतापलेल्या मोहनने खोलीला कुलूप लावून पत्नीचा कुऱ्हाडीने वार करून खून केला. इतकेच नाही तर त्याने 4 महिन्यांच्या बाळाचीही हत्या केली. शौचालयास जाऊ न दिल्याच्या कारणावरून दोन गट भिडले, वैजापूरमध्ये लॉज मालकासह एकाला बेदम मारहाण तरुणाने कुऱ्हाडीने वार करून निष्पापाची हत्या केली. त्यानंतर तरुणाने त्याच खोलीत पत्नीच्या साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली, असे सांगण्यात येत आहे. रात्री उशिरा नातेवाईक घरी पोहोचले असता दरवाजा आतून बंद होता, दरवाजा न उघडल्याने नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली. 3 मृत्यूची माहिती मिळताच अतिरिक्त एसपी शशिशेखर सिंह आणि तपास पथकेही घटनास्थळी पोहोचले. यानंतर त्यांनी कुटुंबीयांची चौकशी केली. मोहन हा शेतीचा व्यवसाय करायचा, यासोबतच तो पीईटीची तयारीही करत होता आणि 2 वर्षापासून त्याचे मानसिक संतुलन ठीक नव्हते, असे पोलिस चौकशीत समोर आले आहे. सध्या पोलिसांनी तिन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.