अविनाश कानडजे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर, 20 मार्च : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. मारहाण, आर्थिक फसवणूक तसेच आत्महत्या, हत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
शौचालयास जाऊ न दिल्याच्या कारणावरून जमावाने लॉज मालकास आणि मुलास बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वैजापूर इथे ही धक्कादायक घटना समोर आली आहे. मारहाणीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तसेच मारहाणीनंतर काही काळ वैजापुरात तणावाचे वातावरण होते.
छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये शौचालयामध्ये जाण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गट आपसात भिडल्याचे पाहायला मिळाले. तर यावेळी जमावाने लॉज चालक आणि मालकाला चक्क लोखंडी रॉडने फिल्मी स्टाइल बेदम मारहाण केली. वैजापूर शहराजवळ असलेल्या मुंबई-नागपूर महामार्गावर ही घटना घडली. तर या घटनेनंतर पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
शेगावला दर्शनासाठी निघाले मात्र रस्त्यातच 6 जणांचा मृत्यू; समृद्धी महामार्गावर घडलं भयानक
तौसीफ हनिफोद्दीन शेख, सय्यद अजहर कदीर आणि जमील सगीर शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या घटनेत इंगळे वस्तीवर राहणारे लॉजचालक आकाश मापारी आणि त्यांचे वडील संजय मापारी जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.