भरतपुर, 26 मे : राजस्थानमधील (Rajasthan News) भरतपूर जिल्ह्यातून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीच्या तक्रारीनंतर जळत्या (Crime News) चितेवरुन महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. ती व्यक्ती मृत महिलेचे वडील होते. त्यांच्या जावयाविरोधात मुलीची हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल 5 वर्षे बाप आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी लढत होता. आता पाच वर्षांनंतर त्यांच्या मुलीला न्याय मिळाला असून तिची हत्या करणारा तुरुंगात आहे. गुरुवारी आरोपी पतीला न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सोबतच 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. जळत्या चितेवरुन काढला होता मृतदेह… करोली जिल्ह्यातील सुरोठ निवासी मदनलाल जोगी यांच्या मुलीचं लग्न रसेली निवासी हंसेसोबत झालं होतं. 15 मार्च 2017 रोजी पती राकेश आणि त्याच्या नातेवाईकांनी हुंड्याची मागणी करीत हेमाची हत्या केली. यानंतर गुपचूपपणे हेमावर अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र याची सूचना मिळताच मृत महिलेचे वडील तेथे पोहोचले. त्यांनी पाहिलं की, मुलीचा मृतदेह चितेवर जळत आहे. त्यांनी पोलिसांना याबाबत सांगितलं, यानंतर हेमाचा अर्धवट जळालेला मृतदेह चितेवरुन बाहेर काढला आणि त्याचं पोस्टमार्टम करण्यात आलं. यानंतर हेमाच्या पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. अखेर न्याय मिळाला… पाच वर्षांपर्यंत वडील आपल्या मृत मुलीला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करीत होते. मुलीची हत्या करणाऱ्या तिच्या पतीला कडक शिक्षा व्हावी यासाठी ते लढत होते. गुरुवारी न्यायालयाने पती राकेशला दोषी मानत त्याला शिक्षा सुनावली. न्यायालयाने त्याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.