Home /News /crime /

Jalgaon: हेडफोन घालून रेल्वेरूळ ओलांडणं बेतलं जीवावर; ट्रेनच्या धडकेत जळगावातील महिलेचा मृत्यू

Jalgaon: हेडफोन घालून रेल्वेरूळ ओलांडणं बेतलं जीवावर; ट्रेनच्या धडकेत जळगावातील महिलेचा मृत्यू

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

Jalgaon news: स्नेहल यांचे दोन वर्षांपूर्वी नाशिक येथील वैभव सोनार यांच्यासोबत लग्न झाले होते. तर शिक्षण अपूर्ण राहिल्याच्या कारणामुळे त्या दिवाळीपासून माहेरी आल्या होत्या. त्या आपल्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी जळगाव शहरातील बळीराम पेठ येथे एका दुकानात कामाला होत्या.

पुढे वाचा ...
    जळगाव, 25 मे : जळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही घटना रेल्वे रुळ ओलांडताना (Railway Crossing) एका तरुणीसोबत घडली आहे. दिवसेंदिवस चैनीच्या गोष्टी वाढल्याने मानवी जीवनात एक प्रकारचं ढिलेपण आल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे अनेकदा तो काय करतोय, त्याच्या लक्षात येत नाही. अशीच एक धक्कादायक घटना जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात घडली आहे. नेमकं काय घडलं  रेल्वे रुळ ओलांडणे (Railway Crossing) एक तरुणीला भलतेच महागात पडले आहे. रेल्वे रुळ ओलांडताना एक विवाहित तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. (Death while Railway Crossing) ही तरुणी आपले काम आटपून शिवाजी नगरातील आपल्या घरी जात होती. मात्र, याचवेळी ती आपल्या पतीसोबत बोलत होती. तसेच मोबाईलवर बोलताना तिने इअरफोन घातले होते. याचदरम्यान, रेल्वेरुळ ओलांडताना रेल्वेचा धक्का लागल्याने तिचा मृत्यू झाला. स्नेहल वैभव सोनार (वय 19, रा. धनाजी काळे नगर, शिवाजीनगर) असे मृत विवाहितेचे नाव आहे. स्नेहल यांचे दोन वर्षांपूर्वी नाशिक येथील वैभव सोनार यांच्यासोबत लग्न झाले होते. तर शिक्षण अपूर्ण राहिल्याच्या कारणामुळे त्या दिवाळीपासून माहेरी आल्या होत्या. त्या आपल्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी जळगाव शहरातील बळीराम पेठ येथे एका दुकानात कामाला होत्या. नेहमीप्रमाणे सोमवारी देखील काम संपल्याने त्या घरी जायला निघाल्या होत्या. शिवाजीनगर उड्डाणपूलाचे काम सुरु असल्याने तो बंद होता. त्यामुळे त्या बळीरामपेठजवळील रेल्वेरुळाकडून गेल्या. याचवेळी त्यांनी कानात इयरफोन घातले होते. तसेच त्या त्यांच्यापतीसोबत फोनवर बोलत होत्या. याचदरम्यान सुरत-भुसावळ एक्सप्रेस जळगाव स्थानकाहुन निघून भुसावळकडे निघाली होती. लोको पायलट अशफाक अन्सारी यांना रुळालगत कोणीतरी चालत असल्याचे दिसून आले. त्यांनी दोन-तीन वेळा हॉर्न दिला. मात्र, स्नेहल यांच्या कानात इयरफोन असल्यामुळे त्यांना रेल्वेचे हॉर्न ऐकू आले नाही. त्यामुळे शेवटी त्यांना रेल्वेचा जोरदार धक्का लागला. डोक्याच्या मागच्या बाजूस फटका बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर अन्सारी यांनी वॉकीटॉकीवरुन घटनेची माहिती स्टेशन मास्तर यांना दिली. दुसऱ्या दिवशी मंगळवारी त्यांचा मृतदेह हा कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हेही वाचा - Buldhana: प्री वेडिंग शूट केल्यावर रात्री एकत्र मुक्काम, दुसऱ्या दिवशी तरुणीसोबत घडला धक्कादायक प्रकार कुटुंबीयांचा आरोप -  स्नेहल यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे वडील एकनाथ तोडकर यांनी आरोप केला आहे. ते म्हणाले की, स्नेहल व तीचे पती वैभव यांच्यात सतत भांडण व्हायचे. त्यामुळे ती कायम तणावात असायची. सोमवारी रात्रीही फोनवर त्यांच्यात वाद सुरू होते. पतीशी बोलत असताना तणावात असल्यामुळे तीच्यासोबत हा प्रकार घडला आहे. पतीच्या तणावातून हा अपघात झाल्याचे ते म्हणाले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Death, Jalgaon, Railway track

    पुढील बातम्या