Home /News /maharashtra /

नात्याला काळीमा, आजोबाने 13 वर्षांच्या नातीवर केला अत्याचार, काकानेही तोडले लचके!

नात्याला काळीमा, आजोबाने 13 वर्षांच्या नातीवर केला अत्याचार, काकानेही तोडले लचके!

सख्ख्या आजोबानेही नातीवर वाईट दृष्टी ठेवून तिच्याशी वेळोवेळी अश्लील चाळे केले. असाच प्रकार नात्यात काका लागणाऱ्या अनिलनेही केला

सख्ख्या आजोबानेही नातीवर वाईट दृष्टी ठेवून तिच्याशी वेळोवेळी अश्लील चाळे केले. असाच प्रकार नात्यात काका लागणाऱ्या अनिलनेही केला

सख्ख्या आजोबानेही नातीवर वाईट दृष्टी ठेवून तिच्याशी वेळोवेळी अश्लील चाळे केले. असाच प्रकार नात्यात काका लागणाऱ्या अनिलनेही केला

    नेहाल भुरे, प्रतिनिधी भंडारा, 25 मे :  भंडाऱ्यात सख्खा आजोबाच (Grandfather ) आपल्या नातीचा वैरी निघाला. नात्याला काळीमा फासत आजोबाने असहायतेचा फायदा उचलत आपल्या 13 वर्षांच्या अल्पवयीन नातीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना भंडारा (bhandara) जिल्ह्याच्या लाखनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. धक्कादायक म्हणजे, या अल्पवयीन नातीवर अन्य दोन आरोपींनी ही अत्याचार केल्याचे सामोर आले आहे.  नराधम आजोबासह अन्य दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास देवराम तुमसरे (वय 56 वर्ष), यशवंत तातोबा कमाने (वय 67 वर्ष, दोन्ही रा. गडेगाव ता. लाखनी), अनिल रमेश सेलोकर (वय 25 वर्ष  रा. रोहणा ता. मोहाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहेत. पीडिता ही 13 वर्षांची असून पीडितेच्या वडिलांचा मृत्यू झाला असून ती आई आणि आजोबासह राहते. तिच्यावर 2019 पासून हा नराधम आजोबा अत्याचार करत होता. 11 वर्षाची असताना तिला पहिला अत्याचाराचा सामना करावा लागला. 2019 मध्ये पीडिता ही एकटीच शेतात गेली असताना तिथे कोणीच नसल्याची संधी साधून आरोपी विलास तुमसरे याने तिला बळजबरीने शेतातील झोपडीत नेऊन अत्याचार केला. त्यानंतर, घटनेबाबत वाच्यता केल्यास भावाला आणि आईला मारून टाकेल अशी धमकी दिली. पीडितेने घटनेची माहिती कुणालाही दिली नाही. त्यामुळे आरोपीची हिम्मत वाढल्याने त्याने चिमुकलीवर आणखी तीन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केला. (5वी पास ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी गव्हर्नमेंट जॉबची मोठी संधी; लगेच करा अर्ज) दरम्यान, सख्ख्या आजोबानेही नातीवर वाईट दृष्टी ठेवून तिच्याशी वेळोवेळी अश्लील चाळे केले. असाच प्रकार नात्यात काका लागणाऱ्या अनिलनेही केला आहे. मागील तीन वर्षांपासून वारंवार होणारा अत्याचार असह्य झाल्याने पीडितेने स्वतः पोलिसात जाऊन तक्रार दाखल केल्यानंतर हा किळसवाणा प्रकार उघडकीस आला. (एकीकडे कडाक्याचा उष्मा, त्यातच पाणीटंचाईने नाशिककरांचा थेंबा-थेंबासाठी संघर्ष) घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पीडितेच्या तक्रारीवरुन आजोबांसह तिघांविरुद्ध विनयभंग, अत्याचार आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली आहे.  तिघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मात्र नात्यातील व्यक्तिद्वारे असा किळसवाणा प्रकार झाल्याने नात्यावर विश्वास ठेवावा कसा असा प्रश्न आता समोर आला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या