Home /News /crime /

Father Killed Daughter : प्रियकराशी बोलत होती 20 वर्षीय तरुणी, बापाने रागाच्या भरात केली हत्या

Father Killed Daughter : प्रियकराशी बोलत होती 20 वर्षीय तरुणी, बापाने रागाच्या भरात केली हत्या

मृत आफरीन (फाईल फोटो)

मृत आफरीन (फाईल फोटो)

Bihar crime: 20 वर्षांची मुलगी आफरीन हिचे लग्न तिच्या वयापेक्षा मोठ्या वयाच्या मुलासोबत निश्चित झाले होते. तर तेच दुसरीकडे आफरीनचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरू होते. ही गोष्ट घरातील सर्व सदस्यांना माहित होती.

  पाटणा, 25 मे : प्रियकर आणि प्रेयसींना (Girlfriend Boyfriend) ऑनलाईनच्या या युगात सतत आभासी स्वरुपात सोबत राहणं ही शक्य झालं आहे. मात्र, अनेक जणांच्या परिवाराला प्रेमाला विरोध असतो. त्यात बिहार राज्यातून अशाच एका प्रियकर आणि प्रेयसीसंदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नेमकं काय घडलं प्रियकरासोबत बोलत असल्याने एका मुलीसोबत तिच्या बापाने धक्कादायक प्रकार केला आहे. ही 20 वर्षीय मुलगी आपल्या प्रियकराशी फोनवर बोलत होती. त्यामुळे तिच्या बापाने तिची हत्या (Daughter Murder by Father) केली आहे. बिहार राज्यातील दरभंगा (Darbhanga) जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकेच नव्हे तर हत्या करण्यात आल्यानंतर तिचा मृतदेह (Dead body) हा नदीत फेकून देण्यात आला होता. मात्र, मुलीच्या हत्येचा ऑडिओ व्हायरल (Audio Clip Viral) झाल्याने तिच्या बापानेच तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. यानंतर मृताची आई, बहीण आणि मामा यांनी ही ऑडिओ क्लिप पुरावा म्हणून पोलिसांना दिली आहे. उस्मान असे आरोपी पित्याचे नाव आहे. प्रियकराशी बोलायला केली मनाई ही घटना बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील मोरो पोलीस ठाणे क्षेत्रातील रतनपुरा गावातील आहे. 20 वर्षांची मुलगी आफरीन हिचे लग्न तिच्या वयापेक्षा मोठ्या वयाच्या मुलासोबत निश्चित झाले होते. तर तेच दुसरीकडे आफरीनचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरू होते. ही गोष्ट घरातील सर्व सदस्यांना माहित होती. आफरीनला आपल्या प्रियकरासोबत बोलण्यास वडिलांनी मनाई केली होती. मात्र, असे असतानाही आफरीन तिच्या प्रियकराशी लपूनछपून बोलायची. असेच एक दिवशी ती तिच्या प्रियकराशी मोबाईलवर बोलत होती. यावेळी तिचा पिता आला आणि प्रियकराशी बोलताना पाहून संतापला. यानंतर त्याने रागाच्या भरात आफरीनला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि तिची हत्या करुन टाकली. 15 मे ही घटना घडली. यानंतर हत्या करण्यात आल्यानंतर तिचा मृतदेह हा नदीत फेकून देण्यात आला होता. तसेच ती हरवली आहे, असे गावात सांगितले. त्याच्या दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह सापडला. याच कालाधीत मुलीच्या हत्येचा ऑडिओ व्हायरल झाल्याने तिची हत्या झाल्याचे समोर आले आहे. मृताची आई, बहीण आणि तिच्या मामाने आरोपी वडिलांच्या विरोधात यांनी महिला हेल्पलाइनवर पोहोचून ऑडिओ क्लिप दिली आणि जीवाला धोका असल्याचे संपूर्ण कुटुंबाने सांगितले. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून महिला हेल्पलाइनच्या प्रकल्प व्यवस्थापक अजमनुत निशा यांनी मोरो पोलीस ठाण्याला या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची शिफारस केली. हेही वाचा - वाचून हादरून जाल! युवकाचं पत्नीच्या मैत्रिणीवर जडलं प्रेम; पत्नीनं त्याच मैत्रिणीच्या मदतीनं केलं भयंकर कृत्य
  या संपूर्ण प्रकरणाची ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर खळबळ उडाली आहे. मोरो पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तर ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर दरभंगाचे एसएसपी आकाश कुमार म्हणाले की, हे प्रकरण ऑनर किलिंगचे आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. ऑडिओ क्लिपच्या आधारे कारवाई करण्याचे सांगितले आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Bihar, Boyfriend, Crime, Girlfriend, Murder Mystery

  पुढील बातम्या