नेहाल भुरे, भंडारा 16 ऑक्टोबर : भंडाऱ्यामध्ये एका तरुणाने एक्स गर्लफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं. लग्नापूर्वीची एक्स गर्लफ्रेंड वारंवार पैसे मागत असल्याने या तरुणानं आयुष्याचाच शेवट केला. या तरुणीकडून वारंवार ब्लॅकमेल केलं जात असल्याने कंटाळून विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याचं तपासात समोर आलं आहे. या प्रकरणी तरुणीसह दोघांवर भंडारा जिल्ह्याच्या साकोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मैत्रिणीच्या घरी येऊन तिच्याच आजीला संपवलं; भंडाऱ्यातील अल्पवयीन मुलीचं हादरवणारं कांड राजेश रामकृष्ण वाघाडे (वय 32, रा. उमरी, ता. साकोली) असं मृताचं नाव आहे. याप्रकरणी अस्मिता सीताराम भोयर (वय 23, रा. कोसबी, ता. सड़क अर्जुनी) आणि तिलक ठाकरे (27, रा.साकोली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या या घटनेचा अधिक तपास करत आहेत. गत शनिवारी तरुणाचा मृतदेह मोहघाटा जंगलात फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्याच्या बॅगमध्ये आढळलेल्या सुसाईड नोटमध्ये कंटाळून आत्महत्या केल्याचं नमूद करण्यात आलं होतं. राजेशने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोटमध्ये आत्महत्येचं कारण लिहिलं होतं. अस्मिता त्याला वारंवार पैशाची मागणी करीत होती. तसंच तिलक ठाकरे तिला पाठिंबा देत होता. वर्ध्यात कॉलेजबाहेरच रंगला खुनाचा थरार; जुन्या वादातून घेतलेल्या भयानक बदल्याने खळबळ हे दोघं मिळून सतत धमकी द्यायचे की परिवारासह तुलाही बरबाद करेन. ब्लॅकमेल करून त्याच्याकडून पैसे घेतले जात होते. याचा त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं त्याने आपल्या सुसाईट नोटमध्ये लिहिलं आहे. या याप्रकरणी तरुणीसह दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून साकोली तालुक्यात खळबळ उडाली आहे. घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.