Home /News /crime /

पत्नीला 'त्या' अवस्थेत पाहून पतीला बसला धक्का; गळफास घेऊन संपवलं जीवन

पत्नीला 'त्या' अवस्थेत पाहून पतीला बसला धक्का; गळफास घेऊन संपवलं जीवन

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

Bihar News: बिहारमधून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना नालंदा जिल्ह्यातील आहे. पतीने गळफास (Husband Suicide) घेऊन आत्महत्या केली

    पाटना, 19 मे : बिहारमधून (Bihar News) अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना नालंदा जिल्ह्यातील आहे. पतीने गळफास (Husband Suicide) घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना पतीच्या मृतदेहाशेजारी एक सुसाइड नोट सापडली आहे. ज्यात त्याने आत्महत्येचं कारण सांगितलं. जे वाचून सर्वांनाच धक्का बसला. पतीने सुसाइड नोटमध्ये लिहिलं होतं की, माझी पत्नी घर सोडून निघून गेली होती. तिला आणायला तिच्या माहेरी गेलो होतो. त्यावेळी पत्नी तिच्या प्रियकरासोबत अंथरूणावर होती. हे पाहून मला खूप वाईट वाटलं. माझ्या जगण्याला आता काहीच अर्थ नाही.... ही घटना नालंदा जिल्ह्यातील लहेरी पोलीस ठाणे हद्दीतील आहे. या भागात चंद्रदेव राहत होतो. त्याचं लग्न 2015 मध्ये झालं होतं. त्याचं भाजी विकण्याचं दुकान होतं. त्याने 16 मे रोजी घरात गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांना मृतदेहाशेजारी सुसाइड नोट सापडली. सुसाइड नोटमध्ये पुढे लिहिलं होतं की, पत्नीचे तिच्या क्लासमेट व्यक्तिरिक्त अन्य एका तरुणासोबत अवैध संबंध होते. त्याने पत्नीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला होता. मात्र तिने ऐकलं नाही. मुलं झाल्यावंतरही ती आपल्या प्रियकराला भेटत होती. म्हणून मी आपलं जीवन संपवत आहे. व्यक्तीच्या आत्महत्येनंतर कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. मृत व्यक्तीच्या भावाने त्याच्या पत्नीला अटक करण्याची मागणी केली आहे. ती भावाला त्रास देत असल्याचं त्याने आपल्या जबाबात म्हटलं आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bihar, Crime news, Husband suicide

    पुढील बातम्या