ठाणे, 18 मे : भिवंडीतून
(Bhiwandi) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकशाहीचा स्तंभ असलेल्या शासकीय सेवेतील अधिकाऱ्यानेच शेतकऱ्यांची फसवणूक
(Fraud with Farmer) केली आहे. याप्रकरणी एका नायब तहसीलदाराला
(Nayab Tahsildar) अटक करण्यात आली आहे. विठ्ठल गोसावी असे अटक करण्यात आलेल्या नायब तहसीलदाराचे नाव आहे. शांतीनगर पोलिसांनी ही
(Shanti Nagar Police) कारवाई केली. त्याला 23 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक नीलेश बडाख यांनी दिली.
काय आहे नेमके प्रकरण?
मुंबई-वडोदरा महामार्गातील बाधित शेतकऱ्यांच्या 11 कोटी 66 लाख 64 हजार तब्बल इतक्या रुपयांचा डाव मारण्याचा या नायब तहसिलदाराचा प्रयत्न होता. तो भिवंडी उपविभागीय कार्यालयात सेवेत आहे. अखेर विठ्ठल गोसावी नावाच्या या नायब तहसीलदाराला शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे. तर गोसावी याच्या अटकेमुळे याप्रकरणातील आरोपींची संख्या वाढली आहे. याप्रकरणी आधीच 17 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गोसावीसह अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 18वर पोहोचली आहे.
हेही वाचा - पत्नी, सासू आणि मामाकडून सततचा छळ, मारहाण; कंटाळून तरुणाने घेतला मोठा निर्णय
आरोपी नायब तहसिहलदार झाला होता फरार
उपविभागीय कार्यालयातील कारकून संजय गाढवे यांनी 25 एप्रिलला फसवणूक प्रकरणी तक्रार दिली होती. शांतीनगर पोलिसांत त्यांनी ही तक्रार दाखल केली होती. यानंतर आरोपी नायब तहसिलदार विठ्ठल गोसावी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता. त्याचा शोध शांतीनगर पोलीस घेत होते. रविवारी उशिरा मुंबईतील गोराई येथून गोसावीला अटक करण्यात आली. तर त्याच्या चौकशीदरम्यान, आणखी काही फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.