Home /News /crime /

काळजाला चटका! ड्रायव्हिंग लायसन्सचं वयंही नव्हतं, एकाच बाईकवर चार विद्यार्थ्यांचा प्रवास, अपघात झाला अन... 

काळजाला चटका! ड्रायव्हिंग लायसन्सचं वयंही नव्हतं, एकाच बाईकवर चार विद्यार्थ्यांचा प्रवास, अपघात झाला अन... 

अनेक पालक 18 वर्षे पूर्ण होण्याआधीच मुलांच्या हाती गाडी सोपवतात. याचे भयंकर परिणाम भोगावे लागू शकतात.

    पाटना, 17 मे : बिहारमधील (Bihar News) केशोपूर गावाजवळ मंगळवारी एका बसने बाईकला (Road Accident) धडक दिली. या अपघातात तब्बल 4 जणांचा मृत्यू झाला. ही चार मुलं परीक्षा देऊन घरी परतत होते. चार मुलं एकाच बाईकने घरी जात होते. त्यांना मागून येणाऱ्या बसने धडक दिली आणि या अपघातात चौघांचाही मृत्यू झाला. यापैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाला रुग्णालयात नेण्यात आलं, आणि तेथे उपचारादरम्यान त्याने जीव सोडला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन मुलांचा जागीच मृत्यू झाला. तर एका तरुणाला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र तेथेच त्याचे जीव सोडला. बाईकला धडक दिल्यानंतर वाहन चालक फरार झाला. पुरुषोत्तम कुमार, शिवम कुमार, गोलू कुमार आणि रोहित कुमार अशी या मुलांची नावे आहेत. परीक्षा देऊन घरी परतत होती मुलं... वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे शहरात अनेक लोकांचा जीव गेला आहे. चारही मुलं अकरावीत होते. पहिल्या वर्षाची परीक्षा देऊन ते घरी परतत होते. त्या दरम्यान मागून येणाऱ्या बसने त्यांना धडक दिली. चारही मुलं बसच्या टायरखाली आले होते. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. दोघांनीही पाळले नाहीत वाहतुकीचे नियम... बाईकवरुन केवळ दोघांना जाण्यास परवानगी आहे. मात्र वारंवार वाहतुकीचे नियम पायदळी तुडवले जातात. चार ते पाच जणांचं कुटुंबही बाईकवर बसून प्रवास करतात. मात्र हे चुकीचं आहे. नियम हे नागरिकांच्या सोयीसाठी तयार केले आहेत. आपल्या सुरक्षिततेसाठी त्याचं पालन करणं गरजेचं आहे. त्याशिवाय बस चालकानेही गतीवर नियंत्रण आणणं गरजेचं होतं. दोघांच्याही चुकीमुळे चार तरुण मुलांना जीव गमवावा लागला.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bihar, Road accident

    पुढील बातम्या