कोल्हापूर, 17 मे : अनैतिक संबंधाच्या संशयावरुन पत्नीने पतीचा खून (Wife Killed her Husband) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रकाश पांडुरंग कांबळे (वय 52) असे मृत पतीचे नाव आहे. तर वंदना प्रकाश कांबळे (वय 50), असे आरोपी पत्नीचे नाव आहे. पत्नीने धारदार चाकूने वार करुन आणि डोक्यात दगड घालून आपल्या पतीचा खून (Husband Murder in Kolhapur) केला. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास शाहूवाडी तालुक्यातील नांदगावपैकी मांगूरवाडी येथे घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच संशयित वंदना कांबळे हिला शाहूवाडी पोलिसांनी अटक केली आहे. काय आहे प्रकरण? प्रकाश कांबळे हा आपल्या परिवारासह नांदगावपैकी मांगुरवाडी येथे शेतात कामाला होता. त्याला दारुचे व्यसन होते. त्याती पत्नी वंदना आणि त्याच्यामध्ये अनैतिक संबंधांवरुन सतत वाद होत होते. नेहमीप्रमाणे रविवारीही मध्यरात्रीच्या सुमारास, प्रकाश आणि वंदनामध्ये वाद सुरू झाला होता. प्रकाश आपली पत्नी वंदनाला शिवीगाळ करू लागला होता. यानंतर दोघांमधील भांडण अत्यंत टोकाला गेले आणि वंदनाने धारदार चाकूने प्रकाशच्या गुप्तांगावर तसेच त्याच्या डोक्यात वार केले. त्याच्या डोक्यात दगडही घातला. इतकेच नव्हे तर दोरीने गळा आवळून आपला पती प्रकाशचा खून केला. तसेच शाहूवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्या पतीने आत्महत्या केली आहे, अशी फिर्याद दिली. हेही वाचा - भर लग्न मंडपात ‘लुडो’चा रक्तरंजित खेळ; चार प्लेअरपैकी एकाची हत्या
पतीच्या खूनाच्या बिंग असे फुटले -
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. तसेच शवविच्छेदनासाठी पाठवला. यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करताना मृताच्या अंगावर आणि गुप्तांगावर चाकूचे वार दिसले. याची माहिती लगेचच पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मृत प्रकाशची पत्नी वंदनाची चौकशी केली. या चौकशीत तिने प्रकाशचा खून केल्याची कबूली दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

)







