बरेली, 1 जून : उत्तर प्रदेशच्या बरेलीमधून कथित लव जिहादचा प्रकार समोर आला आहे. एका मुस्लिम तरुणाने आपली ओळख लपवून, कॉम्प्युटर क्लासमध्ये जाणाऱ्या हिंदू तरुणीसोबत मैत्री केली. नंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर त्या दोघांनी मंदिरात जावून लग्न देखील केले. लग्नानंतर या तरुणाने मुलीसोबत शारिरीक संबंध ठेवले. त्यानंतर त्याने याचा व्हिडीओ बनवला. जेव्हा या तरुणीला तरुणाबद्दलची खरी माहिती कळाली तेव्हा तिने या प्रकरणी देवरनिया पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात तक्रार दाखल केली. मिळालेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत,, आरोपी आलिम याला अटक केली आहे. खरी ओळख लपवली घटनेबाबत अधिक माहिती अशी की, देवरानिया येथील रहिवासी असलेली पीडित तरुणी राजेंद्रनगर परिसरात कॉम्प्युटरचे शिक्षण घेत होती. तिच्यासोबतच शिकणाऱ्या एका तरुणानं आपन आनंद असल्याचं सांगत या मुलीसोबत मैत्री केली. त्यानंतर त्याने या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्या दोघांनी मंदिरात जाऊन लग्न देखील केलं. त्यानंतर तो या तरुणीला आपल्या मित्रांच्या रुमवर घेऊन जात असे, त्याने तिच्यासोबत अनेकदा शारिरीक संबंध देखील प्रस्तापीत केले. त्याने फोटो आणि व्हिडीओ देखील काढले. जेव्हा ही मुलगी गर्भवती राहिली तेव्हा ती संबंधित तरुणाच्या घरी पोहोचली, घरी पोहोचल्यानंतर सत्य समोर आलं. आपण ज्याच्यासोबत लग्न केलं तो तरुण आनंद नसून आलिम असल्याचं लक्षात आल्यानंतर तरुणीला मोठा धक्का बसला. Nagpur News : नागपुरात रिसॉर्टवर पोलिसांचा छापा; अश्लील नृत्य, मद्यसाठा अन् बरच काही.., प्रतिष्ठित व्यक्तींचा सहभाग तरुणीचा गर्भपात पीडितेने केलेल्या दाव्यानुसार त्यानंतर तिच्यावर धर्म परिवर्तन आणि निकाहसाठी दबाव टाकण्यात आला. त्यानंतर तिला हाफिजगंजमधील एका खासगी हॉस्पिटमध्ये नेऊन तिचा गर्भपात करण्यात आला. तसेच कोणाला काही सांगितलं तर तिला जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी भादवी 376, 313, 323, 504, 506 अतंर्गत आरोपी आलिम, साबिर, वाजिद, नाजिम आणि त्याची बहिण शिफा यांच्यासह आणखी एकावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.