जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nagpur News : नागपुरात रिसॉर्टवर पोलिसांचा छापा; अश्लील नृत्य, मद्यसाठा अन् बरच काही.., प्रतिष्ठित व्यक्तींचा सहभाग

Nagpur News : नागपुरात रिसॉर्टवर पोलिसांचा छापा; अश्लील नृत्य, मद्यसाठा अन् बरच काही.., प्रतिष्ठित व्यक्तींचा सहभाग

नागपुरात रिसॉर्टवर पोलिसांचा छापा

नागपुरात रिसॉर्टवर पोलिसांचा छापा

नागपूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. एका रिसॉर्टवर पोलिसांनी छापा टाकला आहे. या प्रकरणात अनेक प्रतिष्ठित व्यक्तींवर कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

  • -MIN READ Nagpur,Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

नागपूर, 1 जून, उदय तिमांडे : नागपूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. एका रिसॉर्टवर पोलिसांनी छापा टाकला आहे. या रिसॉर्टमध्ये अश्लील नृत्य सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी रिसॉर्टवर छापा टाकला. रिसॉर्टमध्ये झिंगाट पार्टी सुरू होती, पोलिसांनी या प्रकरणात सहा डान्सर मुलींसह 12 पुरुषांवर कारवाई केली आहे. कारवाईदरम्यान विदेशी दारूचा मोठा साठा तसेच रोकड देखील जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नागपूर जिल्ह्यातल्या उमरेड कऱ्हांडला परिसरात असलेल्या पॅराडाईज रिसॉर्टवर पोलिसांकडून छापा टकण्यात आला आहे. रिसॉर्टमधील दृष्य पाहून पोलिसांनाही धक्का बसला. या रिसॉर्टमध्ये झिंगाट पार्टी सुरू होती.  अश्लील नृत्य सुरू होते. पोलिसांनी या प्रकरणात  सहा डान्सर मुली आणि बारा पुरुषांवर कारवाई केली आहे. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे या कारवाईत नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील काही प्रतिष्ठित नागरिक आणि डॉक्टरांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

Pune News : धूम स्टाईलने बाईक पळवणाऱ्यांचा आला संशय; पडकल्यानंतर पुण्यातील मोठ्या केसची झाली उकल

विदेशी दारूसह रोकड जप्त दरम्यान या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचा साठा देखील जप्त करण्यात आला आहे. तसेच रोकड देखील जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात