मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

माता न तू वैरिणी! पोटच्या 15 वर्षीय मुलाची हत्या; मग घरातच खड्डा खोदून केलं थरकाप उडवणारं काम

माता न तू वैरिणी! पोटच्या 15 वर्षीय मुलाची हत्या; मग घरातच खड्डा खोदून केलं थरकाप उडवणारं काम

पोलीस (फाईल फोटो)

पोलीस (फाईल फोटो)

या घटनेत कंचन देवी नावाच्या महिलेनं आपल्याच 15 वर्षीय मुलाची हत्या केली. इतक्यावरच ती थांबली नाही तर हत्येनंतर या महिलेनं आपल्या मुलाचा मृतदेह पुरण्यासाठी घरातच खड्डा केला आणि..

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bihar, India
  • Published by:  Kiran Pharate

पाटणा 05 डिसेंबर : आई आणि मुलाचं नातं अतिशय खास असतं. असं आपण सर्वांनी अनेकदा ऐकलं आणि पाहिलं असेल की आई आपल्या मुलासाठी अगदी स्वतःचा जीवही धोक्यात टाकायला तयार असते. आपल्या मुलांना प्रत्येक संकटातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी आई नेहमीच धडपडत असते. मात्र, बिहारमधील एका महिलेनं आपल्या मुलासोबतच असं काही केलं जे वाचून तुमचाही थरकाप उडेल.

महिलेने केली पोटच्या मुलाची हत्या, तुरुंगात गेल्यावर उचललं आणखी भयानक पाऊल

या घटनेत कंचन देवी नावाच्या महिलेनं आपल्याच 15 वर्षीय मुलाची हत्या केली. इतक्यावरच ती थांबली नाही तर हत्येनंतर या महिलेनं आपल्या मुलाचा मृतदेह पुरण्यासाठी घरातच खड्डा केला आणि तिथे तो पुरला. या घटनेचा खुलासा तेव्हा झाला, जेव्हा घरातून दुर्गंधी येऊ लागली. ही घटना बिहारच्या औरंगाबादमधील मदनपूर ठाणा क्षेत्रातील शिवगंज येथे घडली.

घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. यानंतर बंद असलेलं ते घर लगेचच सील करण्यात आलं. गावकऱ्यांना आणि इतर कोणालाही या घराकडे न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. यानंतर पाटणामधून एफएसएलची टीम येण्याची वाट बघितली गेली. एफएसएलची टीम इथे पोहोचल्यानंतर घरात खड्डा खोदून त्यातून या मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेची कसून चौकशी केली असता तिने आपला गुन्हा मान्य केला.

भयानक! दारूच्या नशेत आईची हत्या, भाऊ आणि वडिलांवरही हल्ला

विशेष म्हणजे 3 महिन्यांपूर्वी या महिलेच्या 17 वर्षीय मुलीचाही संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. या प्रकरणी औरंगाबादच्या एसडीपीओ स्वीटी सेहरावत यांनी सांगितलं की, अशा परिस्थितीत या महिलेने आपल्या मुलीचीही हत्या केली आहे का, याचाही आता पोलीस शोध घेत आहेत. खुनाच्या या घटनेनंतर गावातील लोकही हादरले आहेत.

First published:

Tags: Crime news, Murder