जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / महिलेने केली पोटच्या मुलाची हत्या, तुरुंगात गेल्यावर उचललं आणखी भयानक पाऊल

महिलेने केली पोटच्या मुलाची हत्या, तुरुंगात गेल्यावर उचललं आणखी भयानक पाऊल

crime news (file photo)

crime news (file photo)

प्रवीण हा गच्चीतून घरात घुसला तेव्हा त्याला पवन हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला.

  • -MIN READ Haryana
  • Last Updated :

सोनीपत, 4 डिसेंबर : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. एका दाम्पत्याने आपल्याच मुलाची हत्या केली होती. याप्रकरणी दाम्पत्याला जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आली होती. मात्र, यानंतर या महिलेने तुरुंगात आणि एक टोकाचे पाऊल उचलले आहे. या घटनेनंतर तुरुंग प्रशासनात खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - हरियाणातील सोनीपत जिल्हा कारागृहात एका महिलेने तुरुंगातील बाथरूममध्ये गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. ही महिला आपल्याच मुलाच्या हत्येप्रकरणी शिक्षा भोगत होती. काही काळापूर्वी जिल्हा न्यायालयाने वृद्ध दाम्पत्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आपल्याच मुलावर चाकू आणि काठीने हल्ला करून त्याची हत्या केल्याचा आरोप दोघांवर होता. या माहितीनंतर, सोनीपत शहर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सोनीपतच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे. तर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बनवासा गावात राहणाऱ्या प्रवीणने 20 सप्टेंबर 2020 रोजी पोलिसांना सांगितले होते की, त्याचा लहान भाऊ पवन (30) त्याचे वडील रणधीर (70) आणि आई किताबो यांच्यासोबत राहत होता. तर तो सहा वर्षांपासून पत्नी आणि मुलांसोबत वेगळा राहत आहे. दोन्ही घरे एकमेकांना लागून आहेत. 20 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी वडील रणधीर आणि आई किताबो यांनी घराचा दरवाजा आतून बंद करून पवनवर धारदार शस्त्राने वार केले, घरातून आवाज येत असताना तो भाऊ पवनच्या घरी जाऊ लागला तेव्हा दरवाजा आतून बंद होता. हेही वाचा -  भयानक! दारूच्या नशेत आईची हत्या, भाऊ आणि वडिलांवरही हल्ला प्रवीण हा गच्चीतून घरात घुसला तेव्हा त्याला पवन हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. तर रणधीर आणि किताबोच्या हातात धारदार शस्त्रे होती. यावेळी, जे करायचे होते ते करून दाखवले होते, असे त्यांनी प्रवीणला सांगितले. यानंतर पीजीआय रोहतकमध्ये पवनचा मृत्यू झाला. प्रवीणच्या जबाबावरून पोलिसांनी प्रवीणच्या पालकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी रणधीर आणि किताबोला अटक केली होती. महिलेचा पतीही तुरुंगात कैद - पोलिसांच्या चौकशीत आरोपीने दारू पिऊन झालेल्या भांडणातून हा प्रकार घडल्याचे सांगितले होते. या प्रकरणाचा तपास करत असलेले एसआय राम सिंह यांनी सांगितले की, सोनीपत जिल्हा कारागृहात एका वृद्ध महिलेने आत्महत्या केली आहे. कारागृहात बांधलेल्या बाथरूममध्ये तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. किताबा तिच्याच मुलाच्या हत्येप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत होती. काही काळापूर्वी या वृद्ध दाम्पत्याला जन्मठेपेची शिक्षा झाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात