मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

भयानक! दारूच्या नशेत आईची हत्या, भाऊ आणि वडिलांवरही हल्ला

भयानक! दारूच्या नशेत आईची हत्या, भाऊ आणि वडिलांवरही हल्ला

घरगुती वादातून मुलाने आपल्या वृद्ध आईला बेदम मारहाण केली.

घरगुती वादातून मुलाने आपल्या वृद्ध आईला बेदम मारहाण केली.

घरगुती वादातून मुलाने आपल्या वृद्ध आईला बेदम मारहाण केली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bihar, India
  • Published by:  Khushalkant Dusane

जमुई, 4 डिसेंबर : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. खूनाच्या घटनाही सातत्याने समोर येत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दारुच्या दशेत एका मुलाने आपल्या आईची हत्या केल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

घरगुती वादातून मुलाने आपल्या वृद्ध आईला बेदम मारहाण केली. तर वडील आणि मोठ्या भावाला जखमी केले. दारूच्या नशेत असलेल्या मुलाने ही हत्या केल्याचे सांगितले जात आहे. त्याने आधी आईला मारहाण केली आणि जखमी झाल्यावर आईच्या कपाळावर दगडाने वार करून तिची हत्या केली.

भाऊ व वडिलांनी त्याला तसे करण्यास मनाई केली असता मद्यधुंद व्यक्तीने त्याला काठीने मारहाण करून जखमी केले. ही घटना बिहारच्या जमुई जिल्ह्यातील गिद्दौर पोलीस स्टेशन हद्दीतील केवाल गावातील आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली.

गिधौर पोलीस स्टेशन हद्दीतील केवाल गावात येथे राहणारा 40 वर्षीय काशी मांझी शनिवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत होता. घरी परतल्यावर तो आणि त्याच्या भावाचा मुलगा एकमेकांशी भांडत होते. याच मुलांच्या भांडणावरून काशी मांझी यांचा भावासोबत वाद झाला होता. वाद सुरू असताना त्याची 60 वर्षीय आई धरणी देवी मदतीला आली, तेव्हा नशेत असलेल्या काशीने त्याच्या आईवर काठीने हल्ला केला. त्यामुळे त्याची आई जखमी होऊन जमिनीवर पडली. जमिनीवर पडलेल्या आईच्या कपाळावरही त्याने दगडाने वार केल्याने तिचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती मिळाली आहे.

हेही वाचा - 'त्याने श्रद्धाचे 35 तुकडे केले, मी तुझे 70 करीन..' धुळ्यातील तरुणाने गर्लफ्रेंडला दिली धमकी, अन् मग...

आईची हत्या केल्यावर तसेच आपल्या भाऊ वडिलांना जखमी करून आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले. हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन घटनेचा तपास सुरू केला. पोलीस या हत्या प्रकरणातील आरोपी फरार काशी मांझी याचा शोध घेत आहेत.

गिधौर पोलिस स्टेशनचे प्रभारी कांत प्रसाद यांनी सांगितले की, धारणी देवी या वृद्ध महिलेला मारहाण करण्यात आली, तिच्या मुलाने दारूच्या नशेत असल्याचेही नातेवाईकांनी सांगितले आहे. फरार काशी मांझी याला पकडण्यासाठी पोलीस शोध मोहिम सुरू केली आहे.

First published:

Tags: Bihar, Crime news, Mother, Murder