जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / शालीवरून झाला पुण्यातील चिमुरडीच्या हत्येचा उलगडा; प्रियकराला त्रास होतो म्हणून आईनेच...

शालीवरून झाला पुण्यातील चिमुरडीच्या हत्येचा उलगडा; प्रियकराला त्रास होतो म्हणून आईनेच...

आईनेच केली मुलीची हत्या

आईनेच केली मुलीची हत्या

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई आणि लेकीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेनं खळबळ उडाली आहे.

  • -MIN READ Pune,Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 8 मार्च, वैभव सोनवणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई आणि लेकीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेनं पुण्यात खळबळ उडाली आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरत होती म्हणून जन्मदात्या आईनेच तिच्या तीन वर्षांच्या मुलीला संपवलं आहे. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट देखील लावली. मात्र पोलिसांच्या हाती तपासाचा एक धागा सापडला अन् हत्येला वाचा फुटली. पोलीस या चिमुरडीच्या मारेकऱ्यांपर्यंत पोहोचले. दोन मार्च रोजी खडकी रेल्वे स्टेशन जवळील मोकळ्या जागेत एका तीन वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला होता. गळा दाबून तिचा खून केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते. कुठलाही पुरावा मागे नसल्याने या चिमुरडीची ओळख पटवण्यात अडथळे येत होते. मात्र या चिमुरडीच्या अंगावर जी शॉल होती त्यावरून पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले. आरोपींना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे यामध्ये आरोपी असलेली एक महिला या चिमुरडीची आई आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने या चिमुरडीला आईनेच तिच्या प्रियकराच्या मदतीनं संपवल्याचं समोर आलं आहे. रात्री प्रेयसीला भेटायला गेला पण घडलं भलतच; प्रियकराचा भयानक मृत्यू, घटना समोर येताच पोलीसही चक्रावले! आरोपी महिलेचे यापूर्वी लग्न झालेले आहे. तिला एक मुलगी आहे. काही दिवसांपूर्वीच ती प्रियकरासह पुण्यात पळून आली होती. मात्र रात्री ही चिमुरडी रडायची, त्याचा त्रास या दोघांना व्हायचा. यामुळेच त्यांनी या तीन वर्षीय निष्पाप मुलीची हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह निर्जन ठिकाणी फेकूनही दिला. मात्र कोणताही पुरावा मागे नसताना अतिशय कौशल्याने तपास करत पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात