दिल्ली, 8 मार्च : एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टोळक्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या एका व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या 33 वर्षीय व्यक्तीवर हल्ला झाला, तो व्यक्ती एका खासगी बसचा चालक होता. या घटनेत आतापर्यंत आठ आरोपींची ओळख पटल्याचही पोलिसांनी सांगितलं. सहर असं या हल्ल्यात मृत्यूमुखी पडेल्या व्यक्तीचं नावं आहे. 18 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली होती. त्यानंतर 21 फेब्रुवारी रोजी या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली होती.
प्रेयसीला भेटायला गेला अन्...
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ही घटना केरळातल्या त्रिशूरमधील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टोळक्याच्या हल्ल्यात ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्या व्यक्तीचं नाव सहर असं आहे. तो एका खासगी बसमध्ये चालकाची नोकरी करत होता. काही स्थानिक लोकांनी सहरला त्याची साथीदार असलेल्या महिला चालकाच्या घरातून रात्रीच्या वेळी निघताना पाहिले होते. त्यानंतर या चालकावर हल्ला करण्यात आला असा दावा करण्यात येत आहे. 18 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली त्यानंतर 21 फेब्रुवारी रोजी या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली. आतापर्यंत 8 आरोपींची ओळख पटवल्याचा दाव पोलिसांकडून करण्यात आला आहे.
होळी साजरी करून तो नदीत उतरला पण पोलिसांना थेट मृतदेहच मिळाला, अभियंत्यासोबत पुण्यात धक्कादायक घटना
उपचारादरम्यान मृत्यू
हा चालक टोळक्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तो उपचाराला प्रतिसाद देत नव्हता. त्याची तब्येत खालावत गेली आणि त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Boyfriend, Crime, Crime news, Girlfriend, Murder