• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • क्षुल्लक कारणावरुन टोकाचा वाद, राजधानी दिल्लीत भयानक रक्तपात; एकाचा मृत्यू

क्षुल्लक कारणावरुन टोकाचा वाद, राजधानी दिल्लीत भयानक रक्तपात; एकाचा मृत्यू

क्षुल्लक कारणावरुन टोकाचा वाद

क्षुल्लक कारणावरुन टोकाचा वाद

खरंतर भांडणाचं कारण हे अगदीच क्षुल्लक होतं. पण या भांडणाचे प्रचंड भयानक पडसाद पडले. एका व्यक्तीचा थेट यात जीव गेला. मृतक 44 वर्षीय व्यक्तीचं नाव मनोज असं होतं. तो एका खासगी कंपनीत कामाला होता.

 • Share this:
  नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर : देशाची राजधानी दिल्लीत (New DelhI) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्याने चालत असताना बाईकचा (Bike) धक्का लागला म्हणून एका 44 वर्षीय व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या (Murder) करण्यात आली आहे. संबंधित घटना ही दिल्लीच्या रनहोना परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जमावाकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात मृतक व्यक्तीचे काही नातेवाईक देखील जखमी झाल्याची माहिती समोर आलीय. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासात एक अल्पवयीन मुलगा, एक महिला आणि सात आरोपींना ताब्यात घेतलं. पोलीस सध्या त्यांची चौकशी करत आहेत. पण या प्रकरणामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

  नेमकं प्रकरण काय?

  खरंतर भांडणाचं कारण हे अगदीच क्षुल्लक होतं. पण या भांडणाचे प्रचंड भयानक पडसाद पडले. एका व्यक्तीचा थेट यात जीव गेला. मृतक 44 वर्षीय व्यक्तीचं नाव मनोज असं होतं. तो एका खासगी कंपनीत कामाला होता. तो आपल्या कुटुंबियांसोबत मंगल बाजार परिसरात वास्तव्यास होता. तर त्याची विवाहीत बहीण आपल्या पतीसोबत डिफेन्स एनक्लेव्ह परिसरात राहते. त्याच्या बहिणीचे पती संजीव हे भारतीय सैन्यात कार्यरत आहेत. हेही वाचा : हनी ट्रॅपला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन? चिठ्ठीत लिहिलेला पासवर्ड उलगडणार गूढ मृतक मनोजचे पाहुणे संजीव हे शनिवारी (13 नोव्हेंबर) त्याच्या घरी आले होते. ते काही सामान खरेदी करण्यासाठी बाजारात गेले होते. तिथून परतत असताना बाईक टच होण्यावरुन प्रिन्स नावाच्या एका तरुणासोबत त्यांचं कडाक्याचं भांडण झालं. विशेष म्हणजे हे भांडण इतकं वाढलं की पोलिसांना फोन करुन त्याबाबत माहिती देण्यात आली होती. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करुन प्रकरण मिटवलं. त्यानंतर पोलीसही घटनास्थळाहून निघून गेले. पण भांडण पूर्णपणे मिटलं नव्हतं. हेही वाचा : दारूसोबत खायचा मानवी मांस; आतापर्यंत तिघांची केली हत्या, माथेफिरुला जन्मठेप

  नंतर पुन्हा वाद, हाणामारी; आणि...

  थोड्या वेळाने प्रिन्स, त्याची आई आणखी काही जणांसोबत घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी संजीव यांच्यासोबत पुन्हा वाद घालायला सुरुवात केली. या घटनेची माहिती मिळताच मनोज आणि इतर कुटुंबिय घटनास्थळी दाखल झाले. यावेळी दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली. मारहाणीवेळी आरोपींनी मनोज आणि त्याच्या इतर नातेवाईकांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात मनोज जास्त गंभीर झाला. त्याला तातडीने चननं देवी रुग्णालयात नेण्यात आलं. पण त्याच्यावर उपचार करणाऱ्या डक्टरांनी त्याला तपासलं असता त्याचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. त्यामुळे मनोजच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्याच्या काही नातेवाईकांनी रुग्णालयातच हंबरडा फोडला. हेही वाचा : पत्नीचा अश्लील VIDEO बनवून पतीला अडकवलं जाळ्यात; तरुणासोबत घडला विचित्र प्रकार

  पोलिसांकडून आरोपींना बेड्या

  संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस पुन्हा घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नेमकं काय घडलंय, याची सविस्तर माहिती मिळवली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. पोलीस आरोपींच्या घरी गेले. तिथूनच त्यांना बेड्या ठोकल्या. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.
  Published by:Chetan Patil
  First published: