मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

दारूसोबत खायचा मानवी मांस; आतापर्यंत तिघांची केली हत्या, माथेफिरुला झाली जन्मठेपेची शिक्षा

दारूसोबत खायचा मानवी मांस; आतापर्यंत तिघांची केली हत्या, माथेफिरुला झाली जन्मठेपेची शिक्षा

32 वर्षीय या आरोपीनं याच वर्षी मार्च महिन्यात एक महिला आणि तिच्या मैत्रिणीसोबत भांडण झाल्यानं दोघींची हत्या केली.

32 वर्षीय या आरोपीनं याच वर्षी मार्च महिन्यात एक महिला आणि तिच्या मैत्रिणीसोबत भांडण झाल्यानं दोघींची हत्या केली.

32 वर्षीय या आरोपीनं याच वर्षी मार्च महिन्यात एक महिला आणि तिच्या मैत्रिणीसोबत भांडण झाल्यानं दोघींची हत्या केली.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 16 नोव्हेंबर : गुन्हेगारीच्या दुनियेतील अशा अनेक घटना समोर येत राहतात ज्या ऐकूनच थरकार उडतो (Horrific Crime). ज्याबद्दल विचार करूनही अंगावर काटा येतो. रशियामधून नुकतंच अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे राहणाऱ्या 32 वर्षाच्या व्लदीमिर याला तीन लोकांची हत्या (Murder) केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. हा व्यक्ती केवळ लोकांची हत्याच करत नव्हता तर यानंतर त्यांचं कच्च मांस खात त्यासोबत वोडका पित असे (Cannibal Man).

पत्नी दिवसभर फोनवर बोलायची; तरुणाने पत्नीला दिला भयावह शिक्षा

32 वर्षीय या आरोपीनं याच वर्षी मार्च महिन्यात एक महिला आणि तिच्या मैत्रिणीसोबत भांडण झाल्यानं दोघींची हत्या केली. कोर्टात या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान क्राईम ब्रांचच्या हेडनं सांगितलं की दोघींच्या हत्येनंतर त्याला मानवी मांस खाण्याची इच्छा झाली. अशात त्यानं दोन्ही मृतदेह घरातच ठेवले आणि दारू आणण्यासाठी गेला.

ज्या दोन लोकांची त्यानं मारलं होतं त्यांच्यासोबतच त्याचं नात समोर आलेलं नाही. सोबतच ज्या हत्याराने हत्या करण्यात आली तेदेखील सापडलं नाही. मात्र, आरोपी दोघींचंही मांस खात राहिला. सोबतच तो दारूही पित राहिला. दारू पिताना तो सोबत जे मांस खात होता ते कच्चं होतं. याशिवाय या आरोपीवर आणखी एका व्यक्तीच्या हत्येचा आरोप आहे.

तरुणीचा दिवाळीच्या दिवशीच ट्रेनमध्ये गळफास, आत्महत्येमागील भयानक कारण समोर

मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा पोलिसांना आधीच्या दोन आणि नंतरच्या या एका हत्येच्या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तपासाला सुरुवात केली. यात समोर आलं की व्लादिमीर हाच तिसऱ्या व्यक्तीचाही हत्यारा आहे. पोलीस चौकशीदरम्यान त्यानं आपला गुन्हा मान्य केला आगे. व्लादिमीरला आता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

First published:

Tags: Murder news, Shocking news