राजा मयाल, मुंबई 13 जून : मिरा रोड येथील सरस्वती वैद्य हत्याकांडाच्या तपासात आता नवनवीन खुलासे उघड होत आहेत. आरोपीने सरस्वती वैद्य हिने 3 जूनला विष पिऊन आत्महत्या केल्याचं सांगितलं होतं. तसंच पोलिसांचा सासेमिरा आपल्यावर लागू नये म्हणून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा बनाव आरोपी आखत होता. मात्र आता पोलीस तपासात सरस्वती वैद्य हिची हत्या केल्याचं समोर येत आहे. हत्या करण्यापूर्वी मनोज सानेने बोरीवलीच्या आदर्श स्टोअर्स या नर्सरीच्या दुकानातून कीटकनाशक खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी दुपारी पोलिसांनी आरोपी सानेला बोरीवलीच्या बाभई येथील एका नर्सरीच्या दुकानात नेलं होतं. तिथे केलेल्या चौकशीत साने यानेच किटकनाशक खरेदी केल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे सानेनं तिला विष देवून, तिची हत्या केली का? याबाबत आता पोलीस तपास करत आहेत. Mumbai Mira Road Murder: सरस्वतीचा खुनी मनोज साने कोट्यवधींच्या मालमत्तेचा मालक; दिवसभर असायचा नशेत साने आणि सरस्वती यांच्या मोबाइलची आणि सीडीआरची पोलीस आता कसून तपासणी करत आहेत. या गुन्ह्याचे गंभीर्य पाहून पोलिसांनी मीरा-भाईंदर महापालिकेकडे सरकारी पंच मागितलं आहे. त्यासंबंधीचं पत्र नया नगर पोलिसांनी पालिकेच्या आयुक्तांना दिलं होतं. पालिकेनेही पालिकेचा कर्मचारी सरकारी पंच म्हणून दिला आहे. सोमवारी मयत सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे तिच्या बहिणींनी जे.जे. रुग्णालयातून घेतले आहेत. त्यानंतर सरस्वतीवर मुंबईतील रे रोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्याचबरोबर सोमवारी सरस्वतीच्या तिन्ही बहिणींचे डीएनए नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. सानेने सरस्वतीसोबत मंदिरात लग्न केल्याची माहिती पोलिसांना सरस्वतीच्या बहिणींनी दिली होती. 2014 साली भिंवडीच्या वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात लग्न केल्याची माहिती आता सुञांकडून मिळत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.